अकलूज येथे प्रांत कार्यालयासमोर क्रांतिकारी संघर्ष सेनेचे खोऱ्या, पाट्या आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी/खुडूस:
मौजे, सोलापूर ,अकलूज प्रांत कार्यालय समोर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे क्रांतिकारी संघर्ष सेना( महाराष्ट्र राज्य )संस्थापक अध्यक्ष सुधीरभाऊ साठे सर व प्रदेशाध्यक्ष गणेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली खोऱ्या, पाट्या आंदोलन करणार आहे.
माळशिरस ते टेंभुर्णी नवीन रोडचे काम चालू आहे रस्त्याचे काम चालू असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सोसावा लागत आहे. नागरिकांना येण्या-जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन जावे,यावे लागत आहे. रस्ता उकरून ठेवल्यामुळे माती चेहऱ्यावर व तोंडावर येत आहे. त्याच्यामुळे अपघात होत आहेत. कित्येक जणांना आपला जीव मुठीत घेऊन गाडी चालवावी लागत आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण त्रास सोसावा लागत आहे. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाणात वाढ झालेली आहे. काही जणांचे जीव सुद्धा गेलेले आहेत. अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. असे अपघात झाले तर ठेकेदार व रस्त्याचे काम घेणाऱ्या कंपनीवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी. गणेशगाव पाटी या ठिकाणापासून आंदोलनाला सुरुवात होईल येथील रस्त्याचे खड्डे बुजवून, पाणी मारून, रेडियम लावून प्रांत कार्यालय अकलूज येथे कार्यालयासमोर १६/१/२०१९ रोजी खोऱ्या पाटी आंदोलन करण्यात येणार आहे आंदोलन कर्त्यास काही बरेवाईट झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असे लेखी निवेदन सोलापूरमध्ये नायब तहसीलदार नागनाथ मावळकर यांच्यामार्फत सोलापूर जिल्हाधिकारी यांना देण्यात.
यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष दीपक साठे, माळशिरस तालुका रतन ठोकळे, गिरझनी शाखाध्यक्ष सुनील कुचेकर, गिरझणी शाखा उपाध्यक्ष सुनील खुडे ,मानव अधिकारी संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष संतोष मगर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.