राजमाता जिजाऊ जयंती चांदापुरी येथील सदाशिव देठे प्रशाला अँड ज्यु कॉलेज आणि डायमंड इंग्लिश स्कूल मध्ये उत्साहात साजरी…!
पिलीव/सुजित सातपुते
रयतेचे राजे शिवबा व ज्यांच्यामुळे महाराज घडले ती महाराष्ट्र ची माय म्हणजे राजमाता जिजाऊ यांची जयंती माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथे सदाशिवराव निवासी प्रशाला अँड ज्यु.कॉलेज व डायमंड इंग्लिश स्कूल येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यार्थी पूजा मगर, मोनिका पवार,अक्षय बंडगर,रोहित झेंडे ,फिजा पठाण,प्रियंका लोंढे,कोमल जाधव ,प्रथमेश मगर इ विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून महाराष्ट्रास जिजाऊंच्या विचाराची गरज असल्याचे नमूद केले.
यावेळी प्रा.काटे,डी. जी लोंढे,प्रा.अल्ताफ पठाण, साठे मॕडम ,नमिता मॕडम इ.उपस्थित होते प्रास्तविक प्रा.सरक यांनी केले तर आभार प्रा.आर्शिद पठाण यांनी मानले