कर्मवीर विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न…!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व रमेश खलीपे ज्युनिअर कॉलेज मध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे आवचित्य साधून विद्यालयातील विध्याथ्यांनी वर्षभरात विविध क्षेत्रात शिष्यवृत्ती दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत ,खेळात विशेष प्राविण्य व यश संपादित केलेल्या८५ गुणवंत विध्याथ्यांना ट्रॉफी, पुस्तके, पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील तर प्रमुख वक्ते नामवंत कवी नारायण सुमंत होते ,प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील, सौ, लक्ष्मीबाई पाटील, व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या वेळी गणेश पाटील, नारायण पाटील, नारायण सुमंत, प्राचार्य साहेबराव लेंडवे, संभाजीराव भोसले, राहूल मदने, अविनाश जेऊरकर, प्राध्यापक संजय पाटील, चंद्रकांत घाटे, मुख्याध्यापक विनायक आर्वे ,शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते ,प्रास्ताविकात प्राचार्य साहेबराव लेंडवे यांनी अहवाल वाचन केले, दरवर्षी कर्मवीर जयंती वेळी पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित केला जातो त्यावेळी वक्त्यांच्या भाषणाला वेळ मिळत नसल्याने चालू वर्ष्या पासून या कार्यक्रमास सुरवात करीत असल्याचे सांगितले, तर कवी नारायण सुमंत यांनी रयत शिक्षण संस्थेचा गौरव करताना रयतसंस्थेमुळे बहुजनांची मुले शिकली म्हणून राज्यात एकच खरा पाटील म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील त्यांनी घालून दिलेली तत्वे कमवा व शिका स्वावलंबी शिक्षणातून रयतेने जुनी पिढी घडविली म्हणून विध्याथ्यांनी नोकरी साठी न शिकता समाज व देश घडविण्यासाठी शिकण्याचे आवाहन केले त्यांनी देश राबवित असलेल्या स्वच्छ भारत अभियानावर डिश अँटीना व फुलपाखरू या कविता विद्ध्याथ्यांशी संवाद साधत सादर केल्या, जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील यांनी विद्द्यालयासाठी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निधीतून जीम साठी लागणारे साहित्य मंजूर केल्याचे सांगितले, सूत्रसंचालन पी एच सुरवसे, श्रीमती एस एच लिंगे, पर्यवेक्षक एम के गायकवाड, स्वागतगीत इयत्ता नववितील मुली शिक्षक जी पी बेसिकराव ए, ए, पाटील, के डी सातपुते यांनी प्रास्ताविक प्राचार्य साहेबराव लेंडवे आभार प्रदर्शन श्रीमती जरे मॅडम यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *