कु.मेघाराणी देवकर प्रथम क्रमांकाने सन्मानित..!
पिलीव/सुजित सातपुते
सोलापूर विद्यापीठ सोलापूर विद्यार्थी विकास विभाग “युवास्पंदन“ संस्कृतिक मोहोस्तव २०१८/१९ मध्ये घेतल्या गेलेल्या वक्तृत्व स्पर्धेत माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील ग्रांपंचायत सदस्य व दैनिक लोकमतचे प्रतीनिधी श्री. रघूनाथ गणपत देवकर यांची कन्या कु. मेघाराणी रघुनाथ देवकर (सोलापूर विद्यापीठ सोलापूर यम.एस्सी प्रथम वर्ष) “मतदारची जबाबदारी” या विषयावरती जोशपूर्ण विचार व्यक्त करून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे.तिच्या या यशाबद्दल सोलापूर विद्यपिठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांचे शुभहस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रॉफी, प्रमाणपत्र,पुष्पहार देवुन मेघारणीला सन्मानित करण्यात आले.कु.मेघाराणी देवकर हिने यापूर्वी श्रीराम गणेश मित्र मंडळ पिलीव,रयत शिक्षण संस्था सातारा, पंढपूर, कै.यशवंतभाऊ स्मृति चषक भोसे आशा क्रमांकाने राज्यस्तरीय स्पर्धेत पारितोषिके पटकावली असून महाराष्ट्र शासन अंतर्गत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून होत असलेल्या वक्तृत्व स्पर्धेत २०१२ ते २०१५ मध्ये सलग तीन वर्ष गुणवत्ता यादीत नाव झळकावून पिलीव सारख्या ग्रामीण भागाच्या शिरपेच्यात मानाचा तूरा रोवला आहे.मला वक्तृत्त्व स्पर्धेसाठी श्रीराम गणेश मित्र मंडळ पिलीव,सदगुरू श्री श्री गणेश उत्सव श्री श्री नगर,रयत शिक्षण संस्था सातारा-पंढरपूर यांचे सहकार्य लाभले असून प्रा.उनाळे,घनवट,प्रा.चांगदेव कांबळे,सौ.सातपुते के.डी,मोहीनी देवकर,प्रा.मयुरी जाधव,चैतन्यकुमार देवकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे मेघाराणीने पिलीव अपडेटशी बोलताना सांगितले.तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.