वेळापुर येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेची मिटींग संपन्न,..!

पिलीव/सुजित सातपुते
वेळापुर येथे माळशिरस तालुक्यातील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेची मिटींग संपन्न झाली.माळशिरस तालुक्यातील दिव्यांगांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना नुकतेच निवेदन दिले असुन येत्या २६ जानेवारीला दिव्यांगांच्या आंदोलना संदर्भात महत्वाची मिटींग महादेव मंदीर परीसरात पार पडली.यावेळी दिव्यांगांच्या विविध अडचणी आॅनलाईन सर्टीफीकेट काही ग्रामपंचायतीने निधीचे वाटप न केलेल्या ३% निधीसंदर्भात तीव्र आंदोलन आयोजित केलेले आहे.त्या संदर्भात महादेव मंदीर परीसर वेळापूर येथे मीटिंग आयोजित करण्यात आली होती यावेळी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी –संघटना कार्याध्यक्ष विजयकाका कुलकर्णी, प्रदिप खंडागळे, सुरेश जाधव, सोमनाथ भोसले, धनाजी चव्हाण, आदम तांबोळी, मौलाभैय सय्यद, अमर चोरमले, कुमार सावंत अशोक माने, लाला शिंदे, भाऊसाहेब निंबाळकर, नंदकुमार निंबाळकर, तुळसाबाई साठे, मारुती सुरवसे, भामाबाई औताडे, अंकुश कदम आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते.

चौकट-

कलेक्टर यांनी १८ जानेवारीपर्यंत तोडगा काढणार असल्याचे संघटनेचे विजय कुलकर्णी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *