पिलीव येथील श्री व सौ डॉ.पवार दाम्पत्याची सोलापूर मॅरेथॉनमध्ये बाजी…!
पिलीव/सुजित सातपुते
सोलापूर जिल्हा २१ किलोमीटर पुरुष व महिला मॅरेथॉन स्पर्धा सोलापूर आयोजित स्पर्धेमध्ये महिला मॅरेथॉन स्पर्धेत माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील प्रसिद्ध”डॉ.सौ.वंदना दिलीप पवार”यांनी २१ किलोमीटर अंतर २ तास ११ मिनिटात पार करुन जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकविला आहे.तर पुरुष मॅरेथॉन स्पर्धेमध्ये कै.मारुतीराव पवार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष पिलीव गावचे नामांकित”डॉ.दिलीप मारुतीराव पवार”यांनी २१ किलो मीटर अंतर १ तास ५४ मिनीटात पार करुन जिल्ह्यात ६ वा क्रमांक पटकविला आहे.श्री व सौ डॉ.पवार दाम्पत्याने मॅरेथॉनमध्ये क्रमांक मिळवून पिलीव गावचे नाव गुणवत्ता यादीमध्ये झळकावून पिलीवच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला आहे.त्यामुळे या दाम्पत्याचे पिलीव परासरातील सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.