राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन संचलनासाठी एेश्वर्या गाडे हिची निवड
अकलूज/सचिन करडे
दिनांक २६जानेवारी २०१९रोजी शिवाजी पार्क दादर मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक संचलन करिता अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु. ऐश्वर्या गाडे या विद्यार्थिनीची निवड झाली आहे. राष्ट्रीय प्रजासत्ताक संचलन सराव शिबीर दिनांक २४ नोव्हेंबर २०१८ते०४डिसेंबर२०१८या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर. येथे संपन्न झाले या शिबिरात सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातून या विद्यार्थिनीने आपला सहभाग नोंदवला होता. या शिबिरातून तिची निवड करण्यात आली आहे. या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. चंद्रशेखर ताटे,प्रा.दादासाहेब कोकाटे,डॉ. चंकेश्वर लोंढे महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी तिचे अभिनंदन केले.