उद्या पिलीव येथे संग्राम राजे प्रतिष्ठानतर्फे भव्य दहीहंडी सोहळा !

पिलीव/ सुजित सातपुते

माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कृषी व पशुसंवर्धन चे माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली संग्राम राजे प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी आर्वे मैदान येथे भव्य दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात मानवी मनोरे, गोविंदा पथकांचा थरार तसेच ढोल-ताशांच्या निनादात उत्साहपूर्ण वातावरण अनुभवायला मिळणार आहे.

भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांशी संबंधित असलेली दहीहंडीची परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उत्सवाचा अविभाज्य भाग आहे. गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे रचून उंचावर बांधलेली हंडी फोडण्याची ही परंपरा उत्साह, एकजूट आणि सांघिक भावनेचे प्रतीक मानली जाते.

या पार्श्वभूमीवर पिलीव व परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी सोहळ्यास नागरिक, युवक तसेच गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संग्राम राजे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *