कुसमोड गावची कन्या कु.पुनम तुषार लवटे यांची सहाय्यक महसूल अधिकारी पदी निवड !

पिलीव/सुजित सातपुते

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत माळशिरस तालुक्यातील कुसमोड गावचे माजी सरपंच तुषार लवटे यांची कन्या कु. पुनम तुषार लवटे यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. त्यांची ‘सहाय्यक महसूल अधिकारी’ (Assistant Revenue Officer) या पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे कुसमोड गावाची मान अभिमानाने उंचावली असून संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे, ग्रामीण भागातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या ‘स्वप्न ते यश’ प्रवासाचे कौतुक करण्यासाठी समस्त ग्रामस्थ कुसमोड यांच्या वतीने त्यांना भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या असून कु.पुनम लवटे यांच्या या यशामुळे परिसरातील इतर तरुण-तरुणींना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी आणि प्रशासकीय सेवेत रुजू होण्यासाठी मोठी प्रेरणा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *