अकलुच्या सहाय्यक वाहन निरीक्षकास ५५00 रुपयेची लाच घेताना रंगेहात पकडले.
अकलूज/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील अकलुज येथील परीवहन कार्यालयाचे सहाय्यक वाहन निरीक्षक रामदास अरुणराव कुलकर्णी यांना ५५०० रुपयाची लाच घेताना लाचलुचपत खात्याने रंगेहात पकडले आहे.याबाबत अकलुज पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे. लाचलुचपत विभाग सोलापूर यांच्या कडून मिळालेल्या माहीतीनुसार अकलुज उपविभागिय परीवहन कार्यालयात सहाय्यक वाहन निरीक्षक म्हणुन कार्यरत असणारे रामदास अरुणराव कुलकर्णी यांनी पाच वाहने ट्रान्सफर करणेसाठी नाहारकत व परवाना देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ५५०० रुपये लाच मागितली होती.याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभाग सोलापूर यांच्या कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती.सदर तक्रारीची चौकशी करुन लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी अकलुज येथिल उपप्रादेशिक परीवाहन कार्यालय परीसरात सापळा लावला असता तक्रारदार यांचे कडून ५५०० रुपये लाच स्विकारताना सहाय्यक वाहन निरीक्षक रामदास अरुणराव कुलकर्णी यांना रंगेहाथ पकडले.
सदरची कारवाई संदीप दिवान,अँन्टी करप्शन ब्युरो पुणे,दिलीप बोरस्ते अप्पर पोलीस आधिक्षक अँन्टी करप्शन ब्युरो यांच्या मार्गदर्शनाखाली अँन्टी करप्शन ब्युरो सोलापुरचे अरूण देवकर,पो.उप अधीक्षक,पोनि जगदीश भोपळे, जगदीश भोपळे पोलीस निरीक्षक,निलकंठ जाधावर सहा.पो.उपनिरीक्षक,पो.काँ.सिध्दाराम देशमुख, पो.काँ.प्रफुल्ल जानराव या टिमने ही कारवाई केली.