भाकर फौंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना समाज प्रबोधनाचे संदेश देऊन नवीन वर्षचे स्वागत

पिलीव/प्रतिनीधी
भाकर फौंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,सावित्रीबाई फुले, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.ए पी जी अब्दुल कलाम यांचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन नवीन वर्षाचे स्वागत जिल्हा प्राथमिक शाळा शेंडगेवाडी येथील मुलांना शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मुलांना पोष्टरच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात आला.
यावेळी संस्थेचे प्रवर्तक तथा अध्यक्ष शिवाजी शेंडगे यांनी सांगितले की शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते.
” डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगत “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते जो पिल, तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही”. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाज हितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडली पाहिजेत. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे केंद्रस्थान आहे. तसेच शिक्षण घेणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो मुलांनी घेतला पाहिजे. शाळेतील मुलांनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत .मुलीनी फक्त दहावी पर्यंत शिक्षण घेऊन थांबबायच नाही तर उच्च शिक्षण घेऊन मोठ झाले पाहिजे.
यावेळी पोस्टर च्या माध्यमातून स्वछता ठेऊ भरपूर, डॉक्टर राहातील दूर दूर, शौचालय असेल जिथे, खरी प्रातिष्ठा येईल तिथे, नका करू वृक्षांना नाश, होईल पर्यावर्णचा ऱ्हास. अशा प्रकारे मुलांनी एकमेकांना संदेश देऊन नवीन वर्षाचे स्वागत नाविन्यपूर्ण पद्धतीने केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक लोखंडे सर, संस्थेचे प्रशांत सर, भाकर फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी शेंडगे आणि संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *