पिलीवच्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हरिसिंग भैस यांचे निधन…!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हरिसिंग लालसिंग भैस यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.हरिसिंग भैस हे वयाची साठी ओलांडली तरी एखाद्या तरुण कार्यकर्त्याप्रमाणे चळवळीत काम करायचे व पिलीव परिसरातील अन्यायग्रस्त लोकांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करायचे.त्यामुळे गोर-गरिबांसाठी लढणारा साठीच्या वयाचा एक कार्यकर्ता हारपल्याने संपुर्ण पिलीव गावावर दुखःचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी,सुन,नातवंडे असा परिवार आहे.