बी.टेकच्या तिसऱ्याच वर्षात सानिका सरगर-पाटील यांना वार्षिक ९ लाखांच्या पॅकेजची संधी

पिलीव/सुजित सातपुते

उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत कु.सानिका उत्तमराव सरगर-पाटील यांनी बी.टेकच्या तिसऱ्या वर्षातच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे वार्षिक ९ लाख रुपयांच्या पॅकेजवर नोकरीसाठी निवड होण्याचा मान मिळविला आहे. या यशामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि गुणवत्तेच्या बळावर सानिका यांनी हे यश मिळविले असून, विद्यार्थ्यांसाठी त्या प्रेरणादायी ठरल्या आहेत. शिक्षण घेत असतानाच मिळालेली ही मोठी संधी त्यांच्या उज्ज्वल भवितव्याची नांदी मानली जात आहे.

सानिका यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. भविष्यातही त्या आपल्या कार्यक्षेत्रात उत्तुंग यश संपादन करून कुटुंब, संस्थेचे आणि परिसराचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास सानिकाचे वडिल उत्तमराव सरगर-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *