जनसेवा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी शिवम घोंगडे !

पिलीव/सुजित सातपुते

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनसेवा सार्वजनिक उत्सव मंडळ, पिलीव २०२६ च्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.मंडळाच्या स्थापनेपासून सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांवर यंदाही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मंडळाच्या कार्यकारिणीनुसार संस्थापक शिरीष तावरे, अध्यक्षपदी शिवम(सनी )घोंगडे,उपाध्यक्ष सोहेल आतार, तर खजिनदार वृषाल गांधी यांची निवड करण्यात आली आहे.

याशिवाय उत्सवप्रमुख म्हणून आकाश फाळके व सागर देशमुख,सचिव आदित्य महामुनी व कृष्णा शिंदे,तर सहसचिव म्हणून अक्षय नाईकनवरे व एल.बी.गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच कार्याध्यक्ष म्हणून सुजय घाटे व अजय मिसाळ,व्यवस्थापक मनोज सातपुते व श्रवण तेली,तर मिरवणूक प्रमुख म्हणून विक्रांत महामुनी, ओमकार देशमुख, लतेश देशमुख, अक्षद पाटील, अमर तावरे आणि जयंत पवार यांची निवड जाहीर करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून यंदाचा गणेशोत्सव अधिक भव्य, दिव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार मंडळाने व्यक्त केला आहे. सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक परंपरा आणि जनसेवा यांचा वारसा जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष शिवम घोंगडे यांनी माळशिरस टाइम्सशी बोलताना दिली.जनसेवा सार्वजनिक उत्सव मंडळ २०२६ च्या नूतन कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांचे नागरिक, गणेशभक्त व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन होत असून,त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *