राज्यातील सर्व शाळांमध्ये सुरक्षित व सकस आहाराचे नवे नियम लागू

माळशिरस/सुजित सातपुते

महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व शासकीय,अनुदानित व खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित,स्वच्छ व पोषणयुक्त आहार उपलब्ध व्हावा यासाठी राज्यव्यापी अनुपालन आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार शाळांच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या आरोग्यास अपायकारक HFSS (अति साखर, मीठ व चरबीयुक्त) पदार्थांची विक्री, जाहिरात, प्रदर्शन व मोफत वितरणास बंदी घालण्यात आली आहे.

तसेच शाळांनी केवळ FSSAI नोंदणीकृत अथवा परवानाधारक अन्नपुरवठादारांकडूनच अन्नपदार्थ उपलब्ध करून द्यावेत, सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छता, पोषणविषयक जनजागृती आणि नियमित अन्नसुरक्षा तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा, कँटीन चालक व अन्न व्यवसायिकांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासन, सोलापूरचे अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे यांनी ‘माळशिरस टाइम्स’शी बोलताना ही माहिती दिली. राज्यातील सर्व शाळांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *