माऊलींच्या जयघोषाने पिलीव नगरी दुमदुमली : श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज दिंडीचे श्री व सौ जेऊरकर दाम्पत्याच्यावतीने भक्तिभावाने स्वागत !

पिलीव/प्रतिनिधी

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची पायी दिंडी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे भक्तिमय वातावरणात जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले.श्रीराम पत संस्थेचे चेअरमन तथा अष्टविनायक गणेश मित्र मंडळाचे संस्थापक आणि पिलीव ग्रामपंचायतचे माजी सदस्य श्री.अविनाश जेऊरकर व सौ अनिता जेऊरकर यांनी सालाबादप्रमाणे यंदाही दिंडी सोहळ्यातील प्रमुख, वारकरी, वीणेकरी, टाळकरी तसेच डोक्यावर तुळस घेऊन चालणाऱ्या महिलांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान केला.

यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.पिलीव बसस्थानक परिसरात पार पडलेल्या उभ्या रिंगणाने उपस्थित भाविकांना भक्तीचा अद्भुत सोहळा अनुभवायला मिळाला. “माऊली… माऊली… माऊली…” या अखंड जयघोषाने संपूर्ण पिलीव नगरी दुमदुमून गेली. विठ्ठलनामाच्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड ध्यासात वारकरी मंडळी अगदी नाहून गेली होती,

यावेळी ग्रामस्थ, भाविक आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिंडीचे दर्शन घेत त्यांच्या सेवेत सहभागी होत विठ्ठलभक्तीचा आनंद अनुभवला. पिलीव नगरीने पुन्हा एकदा वारकरी परंपरेप्रती असलेली श्रद्धा आणि सेवाभाव जपल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले.
वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा, विठ्ठलनामाचा गजर आणि भक्तीचा उत्सव अनुभवत जेऊरकर दांपत्याने श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या दिंडीचे केलेले स्वागत हे भाविकांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणारे ठरले.

मला व माझ्या परिवाराला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पायी दिंडी सोहळ्यातील पालखीचे व वारकऱ्यांचे स्वागत करण्याचा जो अनमोल असा मान मिळतो,तो माझ्यासाठीच नव्हे तर माझ्या पिलीवगावासाठी अभिमानाची गोष्ट आहे, #अविनाश जेऊरकर,पिलीव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *