एक अतुल कुलकर्णी एक लाख अतुल कुलकर्णी !

पिलीव/सुजित सातपुते

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सोलापूर ग्रामीणचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात अभूतपूर्व आणि अत्यंत नियोजनबद्ध पोलीस बंदोबस्त उभारण्यात आला आहे.पालखी महामार्गापासून ते तीर्थक्षेत्र पंढरपूर आणि जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणांपर्यंत काटेकोर नियोजन राबविल्यामुळे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित,शिस्तबद्ध आणि सुरळीत होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

आषाढी वारीदरम्यान लाखो भाविकांची होणारी गर्दी, वाहतुकीवरील ताण, कायदा व सुव्यवस्थेचे संभाव्य प्रश्न आणि आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी बंदोबस्ताचे बारकाईने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील प्रमुख पालखी मार्ग, प्रवेशद्वारे, महत्त्वाचे चौक, संवेदनशील ठिकाणे आणि गर्दीची केंद्रे येथे मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांचा प्रवास सुरक्षित आणि विनाअडथळा व्हावा, यासाठी ठिकठिकाणी पोलीस छावण्या उभारण्यात आल्या असून नाकाबंदी, वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन आणि सतत गस्त यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे पालखी मार्गावरील वाहतूक शिस्तबद्ध राहण्यास मोठी मदत होत असून भाविकांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

याशिवाय स्थानिक पोलीस यंत्रणा, विशेष पथके, वाहतूक शाखा आणि इतर विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधून प्रत्येक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास तात्काळ प्रतिसाद देता यावा यासाठी आवश्यक यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आल्याचे दिसून येते.

ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या सूक्ष्म आणि दूरदृष्टीपूर्ण नियोजनामुळे यंदाच्या आषाढी वारीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नियोजन, शिस्त आणि कार्यतत्परता याबाबत वारकरी तसेच नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात असून, सुरक्षित आणि शांततापूर्ण वारीसाठी पोलीस प्रशासनाने केलेले हे नियोजन विशेष कौतुकास पात्र ठरत आहे.त्यामुळेच म्हणावेसे वाटते की एक अतुल कुलकर्णी,एक लाख अतुल कुलकर्णी

“आषाढी वारी हा श्रद्धा आणि सेवाभावाचा सोहळा आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत संपूर्ण पालखी मार्ग व पंढरपूर परिसरात काटेकोर आणि सक्षम पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक वारकरी सुरक्षितपणे दर्शन घेऊन परतावा, यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दल पूर्ण दक्षतेने कार्यरत आहे.”
#अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *