सव्वीस वर्षांनी सवंगडी जमले एकत्र आठवणीना दिला उजाळा…..!


नातेपुते /प्रतिनिधी

इंग्लिश स्कूल वेळापूर येथील सन १९९१-९२ च्या इयत्ता १० वीतील विद्यार्थ्यानी तब्बल सव्वीस वर्षानंतर एकत्र येऊन आपल्या भुतकाळातील आठवणीना उजाळा दिला.यावेळी माजी मुख्याध्यापकासह ज्ञानार्जन करणारे शिक्षकही उपस्थित झाले होते.
इयत्ता ५ वी ते १० वी इंग्लिश स्कूल वेळापुर येथे शिक्षण घेतल्यानंतर सर्व सवंगडी आपल्या मार्गाने उच्चशिक्षणासाठी विविध महाविद्यालयात दाखल झाले होते.यानंतर थोडेफार मित्रच एकमेकांना भेटत होते.परंतु यातील काही मित्राची अद्यापपर्यत भेटच झाली नव्हती. काहि मित्रांनी पुढाकार घेऊन एकमेकांचे मोबाइल नंबर मिळवत व्हॅाटसाऍप ग्रुप स्थापन करुन एकमेकांना संपर्कात आणले.एकमेकांचे विचार आदानप्रदान केले.नुसते विचारच आदान प्रदान न करता आर्थिक अडचणीत असलेल्या मित्राला मदत हा ग्रुपचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला. एका मित्राच्या मुलीला बी.सी.ए प्रवेशाचे पैसेही भरून प्रवेश मिळवून दिला.ते एक मित्राचे आकस्मिक मयत झाले त्याच्या कुटुंबियास पेन्शन व पी.एफ मिळण्यास अडचण होती ती दुर करीत रक्कम मिळवून दिली.सोशल मिडियामुळे २६ वर्षांनंतर एकत्र आलेले विद्यार्थी गेट टुगेदरच्या निमित्ताने नुकतेच समोर आले.तेव्हा मात्र चेहऱ्यांच्या बदलामुळे एकमेकांना अोळखणे कठीण होत होते.त्यातुनच अोळख पटवत होते.आपल्या कुटुंबासह यात सहभागी होऊन आपल्या आठवणींना उजाळा देत होते तर सध्या काय करतो,आपत्य किती याची माहिती देत होते.सर्वांची विचारपूस करीत होते.मुलीनीही आपल्या प्रपंचातुन वेळ काढत उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शविली .
या कार्यक्रमास माजी मुख्याध्यापक हनुमंत मेलगे,शिक्षक रामचंद्र पाचपुंड,जे.जे.पवार,सुरेश होडगे, नारायण घुले,बोहरी,कर्मचारी अभंगराव ,काटे तर माजी विद्यार्थी प्रवीण मित्रा ,डॅा.अतुल देशपांडे, भास्कर मेलगे,डॅा.अमोल गायकवाड,सयाजी मानेदेशमुख,डी.एम.शिंदे,रामचंद्र अाडत,अनिल राऊत,सुधीर नगरकर,आनंद लोंढे,अमोल बोधे,शंकर राऊत, राजेंद्र राऊत, नवनाथ माने,रमेश साठे,प्रभाकर अंडी,सुनंदा काकुळे,वैशाली कुलकर्णी, गिता कुंभार,अनुराधा कदम,कल्याणी बडवे,संगिता राऊत आदिसह बहुसंख्यजण उपस्थिती होते.
———————————–पदावर असताना शिस्त लागण्यासाठि कडक वागावे लागते. २६ वर्षानंतर तुम्ही एकमेकांना भेटलात एकमेकांच्या मदतीने मोठे कार्य करा.एकमेकांना आधार देण्याचे काम करा.आहे यात समाधानी रहा.जेष्ठ नागरीकांचा आदर करा.आई वडिलांना विसरू नका.
—— हनुमंत मेलगे
माजी मुख्याध्यापक इंग्लिश स्कूल वेळापुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *