क्रांतिकारी संघर्ष सेनेच्यावतीने प्रांत कार्यालय अकलूज येथे बेमुदत धरणे आंदोलन…!
अकलुज/प्रतिनीधी
मौजे अकलूज प्रांत कार्यालयासमोर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे क्रांतिकारी संघर्ष सेना (महाराष्ट्र राज्य )संस्थापक अध्यक्ष सुधीरभाऊ साठे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष गणेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली, माळशिरस तालुका सरचिटणीस चंद्रकांत कोळी संयोजनाखाली बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे.
मौजे चौंडेश्वरवाडी येथील गावठाण उपलब्ध असताना दलित व बहुजन समाजाला गावठाणांमधील जागा देण्यात आलेली नाही. सदरच्या जाग्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात झालेले आहे. घरकुल लाभधारकांना रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना यातून घरकुले आलेले आहेत परंतु जागा नसल्यामुळे ते घरकुले मिळत नाहीत .अशा बेघर मागासवर्गीयांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. राहण्यासाठी जागा नसल्यामुळे समाजाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.सदरच्या गावठाणाची मोजणी व्हावी व ग्रामस्थांना त्या गावठाणातील जागा उपलब्ध करून द्यावी. 16 फेब्रुवारी 2018 या शासन निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी यासाठी क्रांतिकारी संघर्ष सेना (महाराष्ट्र राज्य )बेमुदत धरणे आंदोलन करत आहे.
यावेळी क्रांतिकारी संघटनेचे शिष्टमंडळ उपस्थित होते. माळशिरस तालुका सरचिटणीस चंद्रकांत कोळी, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बंडू कांबळे ,माळशिरस तालुका अध्यक्ष विनोद भोसले, माळशिरस तालुका महिला आघाडी अध्यक्षा शैलेजा जावीर, माळशिरस तालुका उपाध्यक्ष आनंद दळवी, तालुका सचिव रतन ठोकळे ,अकलुज शहराध्यक्ष सोमनाथ साठे, माळीनगर शाखा अध्यक्ष मल्हारी अष्टूळ, बाबरी पुल शाखाध्यक्ष भारत देवकुळे, राजाभाऊ खिलारे, शेखर खिलारे, राहुल लोखंडे, बाबुराव गायकवाड, दीपक हजारे ,अतुल गायकवाड, नागनाथ जाधव, महादेव भिंगारदिवे, कल्पना हजारे ,वैशाली साळुंखे, नागरबाई सातपुते, प्यारनाबाई गायकवाड, सुनिता निंबाळकर, जयश्री निंबाळकर, आण्णासो निंबाळकर, बाबा ननवरे, अजित साठे ,सागर वाघमारे, शिवाजीराव इंगोले देशमुख ,पोपट काळे, हुसेन शेख, श्रीमंत लांडगे ,पोपट साठे, सारिका साठे, अक्षय देडे, समाधान साबळे, शंकर अंकुषराव,आकाश साठे, लखन खुडे, अवधूत कांबळे आदी कार्यकर्ते व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत.
या धरणे आंदोलनाला बऱ्याच संघटनेने जाहीर पाठिंबा दिलेला आहे. बहुजन ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष किरणभाऊ साठे,भ्रष्टाचार विरोधी नवनिर्माण संघ (महाराष्ट्र राज्य) संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, अध्यक्ष मंगेशभाऊ गायकवाड, बंडखोर सेना पक्ष जिल्हाध्यक्ष मकरंद साठे, लहुजी शक्ती सेना माळशिरस तालुका युवा अध्यक्ष महादेव भिंगारदिवे.