हिंदू जनजागृती समितीच्यावतीने पिलीव औट पोस्टला निवेदन…!
पिलीव/सुजित
सातपुते हिंदू जनजागृती समिती ही राष्ट्र संरक्षण आणि धर्म जागृती करणारी सेवाभावी संस्था आहे.सार्वजनिक उत्सव आणि इतर कार्यक्रमात होणार्या गैरप्रकारांबद्दल उदा.राष्ट्रध्वज,राष्ट्रीय प्रतिके आणि मानचिन्हें यांची विटंबना रोखने,फाटांक्याद्वारे होणारे ध्वनि आणि वायू प्रदूषण तसेच देव-देवतांची होणारी विटंबना थांबविने अशा विविध विषयांवर गेल्या १६ वर्षापासून प्रबोधन आणि जनजागृती करते.देशभरात सध्या पाश्चात्त्य कुप्रथांच्या वाढत्या अंधानुकरणामुळे नववर्ष गुढी पाडव्याला साजरे न करता ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजता साजरे करण्याची कुप्रथा वाढीस लागली आहे.या रात्री धुम्रपान,मद्यपान,अम्लीपदार्थांचे सेवन आदिंचे प्रमाण वाढले आहे.वरील अपप्रकारांमुळे अनेक नागरीक,युवती,स्त्रिया यांना घराबाहेर पडणे अशक्य होत असते व या गैर प्रकारामुळे एकुणच राष्ट्रातील युवा पिढी नैतिकदृष्ट्या उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.हे गैर प्रकार रोखण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळे,गडकिल्ल्यांसारख्या ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मध्यपान,धूम्रपान,पार्ट्या करणे यास प्रतिबंध करण्याच्या जनजागृती मोहिमेस आपण सहकार्य करावे.अशा अशयाचे माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील हिंदू जनजागृती समितीच्यावतीने पिलीव औट पोस्टचे पो.कॉ धुमाळ यांना निवेदन देण्यात आले.यावेळी योगेश देशमुख,स्वप्निल सावळजकर,निलेश पिसे,नितीन बुगड,सागर मेटकरी,सागर करांडे यांसह अनेक तरुण व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.