स्पर्धा परीक्षांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिलीव येथे गौरव

पिलीव/ सुजीत सातपुते

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिलीव (मुले) येथे आज टी.एस.ई., मंथन व अक्षरगंगा या स्पर्धा परीक्षांमध्ये राज्य, जिल्हा व केंद्र गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने गौरव सोहळा उत्साहात पार पडला.

या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रशस्तीपत्र व रोख पारितोषिक देऊन त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत व जिद्दीच्या बळावर मिळविलेल्या या यशाबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या यशामागील नियमित मार्गदर्शन, सराव व पालकांच्या सहकार्याची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.

यावेळी उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांना भविष्यातही अशाच प्रकारे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करून शाळेचे व पिलीव गावाचे नाव राज्यभर उज्ज्वल करण्याची अपेक्षा असल्याचे बोलून दाखवले,

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिलीव (मुले) ही स्पर्धा परीक्षांमधील उल्लेखनीय यशामुळे परिसरात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळख निर्माण करत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेकडून सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असल्याचे यावेळी मार्गदर्शक शिक्षकांकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *