पिलीव शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नाना मदने तर उपाध्यक्षपदी अश्विनी वगरे ; पालकांच्या उत्स्फूर्त सहभागातून निवड प्रक्रिया पार !
पिलीव/सुजित सातपुते
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिलीव मुले,येथे बुधवार, दि. 15 जुलै 2026 रोजी सकाळी 10:00 वाजण्याच्या सुमारास शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले.सर्व वर्गांतील पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदविल्याने समितीची निवड बिनविरोध करण्यात आली.
निवड प्रक्रियेनंतर अध्यक्षपदी श्री.नाना मधुकर मदने यांची तर उपाध्यक्षपदी सौ. अश्विनी वगरे यांची बहुमताने निवड करण्यात आली. सदस्य म्हणून योगेश कृष्णात देशमुख, रघुनाथ नरळे, संतोष बोडरे, सारंग बनसोडे, सचिन मदने यांची, तर महिला सदस्य म्हणून रेश्मा रवींद्र खामगळ, रुक्सार जुबेर खान पठाण, राजश्री ओंकार जोशी आणि आम्रपाली सुरज वाघमारे यांची निवड करण्यात आली.

निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा शाळेचे मुख्याध्यापक राजू गोरवे व सर्व शिक्षकवृंद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक राजू गोरवे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढ, विद्यार्थी विकास आणि सर्वांगीण प्रगतीसाठी समितीने सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन केले.
संपूर्ण निवड प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि बिनविरोध पार पडल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पालकांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.