गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देणारा शिक्षण योद्धा “भैय्यासाहेब मोरे “
पिलीव/सुजित सातपुते
शिक्षण हा समाज परिवर्तनाचा सर्वात प्रभावी मार्ग असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची समान संधी मिळावी,या उद्देशाने माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार मा.श्री रणजीतसिंह नाईक-निंबाळकर,मा.सौ.जिजामाला रणजीतसिंह नाईक- निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून मोफत शालेय साहित्य वाटप व संपूर्ण माळशिरस तालुक्यातील अनाथ विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचलणे अशा नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमात गरजू विद्यार्थ्यांना उद्या गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 10:00 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभूड येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे,
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा.सौ. जिजामाला (वहिनीसाहेब) रणजीतसिंह नाईक-निंबाळकर तसेच कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक मा.श्री. भैय्यासाहेब मोरे उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे भैय्यासाहेब मोरे हे अतिशय गरीब कुटुंबातून संघर्ष करत पुढे आलेले नेतृत्व म्हणून परिसरात ओळखले जातात.प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी सामाजिक कार्याची वाट निवडली असून,गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी या उदात्त हेतूने ते सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याबरोबरच त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले आहे.
आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात कोणत्याही विद्यार्थ्याचा अडथळा निर्माण होऊ नये, या भावनेतून राबविण्यात येणारा हा शालेय साहित्य वाटप उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातील सर्व स्तरांतून स्वागत होत असून सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहण्याचे सचिन शेंडगे साहेब,सोमा भाऊ भोसले,किसन शेठ शिंदे,शिवराज पुकळे,निखिल भाई खरात,रमेश बागल व योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माळशिरस टाइम्सच्या माध्यमातून आवाहन केले आहे.