बचेरी गावचे सुपुत्र AU बँकेचे डेप्युटी रिलेशनशिप मॅनेजर शुभम शिवाजीराव सावळजकर यांचा पुणे येथे दुहेरी सन्मान !

पिलीव/सुजित सातपुते

माळशिरस तालुक्यातील बचेरी गावचे सुपुत्र आणि AU बँकेचे डेप्युटी रिलेशनशिप मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले शुभम शिवाजीराव सावळजकर यांना नुकतेच इन्शुरन्स विभागात उत्कृष्ट कामगिरीबद्दल तसेच सर्वोत्तम कर्मचारी (Best Employee) या दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

हा मानाचा पुरस्कार AU बँक महाराष्ट्राचे हेड मा.श्री.नीरव गुप्ता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.पुणे येथील शांताई या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित भव्य समारंभात राज्यभरातील अनेक बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला.शुभम सावळजकर यांनी अल्पावधीतच आपल्या मेहनतीने,ग्राहकाभिमुख दृष्टिकोनातून आणि सेवाभावातून संस्थेमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील टीमने इन्शुरन्स विभागात उल्लेखनीय विक्री तसेच ग्राहक समाधानाचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.

या दुहेरी सन्मानामुळे माळशिरस तालुका आणि बचेरी गावाचे नाव उज्ज्वल झाले असून स्थानिक ग्रामस्थ आणि सहकाऱ्यांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.माझ्या या यशाचे सर्व श्रेय माझे वडील शिवाजीराव सावळजकर व आई मंजुषा सावळजकर यांना जात असल्याचे असल्याचे शुभम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले,

“शुभमने आपली ओळख त्याच्या स्वकष्टाने निर्माण केली आहे.हा पुरस्कार त्याच्या चिकाटीचा आणि प्रामाणिकपणाचा पुरावा आहे.आमचा मुलगा म्हणून आम्हा पती-पत्नीला त्याचा खूप अभिमान वाटतो.”

#शिवाजीराव सावळजकर,शुभमचे वडील

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *