पिलीव येथील एका मुस्लिम चहावाल्याची डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दर्शनाने होते आपल्या दिवसाची सुरुवात !

पिलीव/सुजित सातपुते

धर्म वेगळा असला तरी निष्ठा आणि आदर्श हे मनाचे असतात,याचे जिवंत उदाहरण म्हणजे पिलीव गावातील बादशहा अब्दुल तांबोळी.वय वर्ष ५१ असलेले तांबोळी हे धर्माने मुस्लिम असूनही वयाच्या सोळाव्या वर्षापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर, कार्यावर आणि व्यक्तिमत्त्वावर त्यांना अपार श्रद्धा आहे.गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून ते पिलीव गावातील मुख्य चौकात असलेल्या आपल्या छोट्याशा चहाच्या टपरीमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावून ठेवला आहे,त्या फोटोची दररोज अगदी नित्य नियमाप्रमाणे पूजा करून दिवसाची आपल्या दिवसाची व व्यवसायाची सुरुवात करतात.‘बाबासाहेबांच्या विचारांनीच मला मेहनतीचं आणि प्रामाणिकपणाचं बळ दिलं,’ असे बादशहा तांबोळी सांगतात.

त्यांच्या या निष्ठावान उपक्रमामुळे पिलीवसह परिसरात त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला जातो.विविध समाजघटकातील लोक त्यांच्या टपरीवर येऊन केवळ चहाचा नाही तर विचारांचा सुगंधही अनुभवतात.धर्माच्या पलीकडे जाऊन एकता, मानवता आणि आंबेडकरी विचारांचा संदेश देणाऱ्या तांबोळी यांची कहाणी आजच्या समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे पिलीव परिसरातील आंबेडकरी चळवळीचे नेते रणजीत सातपुते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *