“आपुलकीच्या बंधात गुंफतोय आपले गाव” सरपंच एजाजखान पठाण त्यांचे नाव : पठाण वस्ती ग्रामपंचायतीत होणार दीपावली फराळ सोहळा !

पिलीव/सुजित सातपुते

आपुलकी,एकता आणि आनंद यांचा उत्सव असलेल्या दीपावली सणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत माळशिरस तालुक्यातील पठाण वस्ती ग्रामपंचायत व पठाण वस्ती हद्दीतील सर्व बचत गटांच्या संयुक्त विद्यमाने एक अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
रविवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी गावात दीपावली फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून,या उपक्रमात गावातील अबालवृद्ध, महिला, युवक तसेच सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच एजाजखान पठाण यांनी केले आहे,सरपंच पठाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की दीपावली हा आनंदाचा, प्रेमाचा आणि एकत्र येण्याचा सण आहे. गावातील प्रत्येकाने एकत्र बसून फराळाचा आस्वाद घेतला, तर आपुलकीची भावना अधिक दृढ होईल. हा कार्यक्रम आपल्या सर्वांचा आहे, त्यामुळे चला एकत्र येऊया आणि आपले गाव एकतेच्या दीपांनी उजळवूया हा हिंदू मुस्लिम एकतेचा पठाण यांनी नारा दिला आहे,ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आणि बचत गटांच्या सहकार्याने आयोजित या फराळ सोहळ्यात सर्व नागरिकांनी उपस्थित राहून आनंदाचा दीप लावावा,असे आवाहन पठाण वस्ती ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.ते अतिशय स्तुत्य व समाजिताचा कार्यक्रम असल्याचे पठाण वस्ती गावचे ज्येष्ठ नागरिक अशोक सोनवणे यांनी माळशिरस टाईम्सशी बोलताना सांगितले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *