माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे बांधकाम कामगारांसाठी प्रशिक्षण शिबीर संपन्न : कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस,ता. २८ :
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई यांच्यावतीने सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यात एकूण ९६६१ सक्रिय (जीवित) नोंदणीकृत बांधकाम कामगार असून त्यांना नियुक्त कंपनीच्या प्रशिक्षकांमार्फत विविध प्रशिक्षण दिले जात आहे.
या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शिबिरे घेण्यात येत असून त्याच अनुषंगाने आज माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे हे शिबीर पार पडले.शिबिरात कामगारांना प्रत्यक्ष प्रशिक्षणासोबतच त्यांच्या हक्कांविषयी, सुरक्षितता,आरोग्य आणि कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या कौशल्यवृद्धीसह त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
सदरचे शिबिर सेंट्रल ह्यूमन राईट्स संघटन दिल्ली सोलापूर जिल्हा अध्यक्ष (कामगार आघाडी) मा.रणजीत सातपुते व कंपनीचे प्रशिक्षक श्री.विवेकानंद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले,त्यामुळे बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती मिळाली असून याचा बांधकाम कामगारांना भविष्यात नक्कीच मोठा फायदा होईल,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *