उद्या पिलीव येथे आरोग्य शिबिराचे आयोजन : सर्व गरजूंनी लाभ घ्यावा – डॉ.विलास जाधव
पिलीव / प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उद्या रविवार दि 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत मोफत सर्व रोग निदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधित संपूर्ण देशभरात सेवा पंधरवडा सुरू असून या निमित्तानेच सदर शिबिराचे आयोजन केले असून शिबिराचे उदघाटन माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पिलीव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ ल.विलास जाधव यांनी दिली.यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना ,प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ,आयुष्यमान भारत अंतर्गत स्त्री आरोग्य तपासणी ,हृदयरोग ,मधुमेह अस्थिरोग, बालरोग, त्वचारोग,नेत्ररोग,कान-नाक-घसा, मेंदू शस्त्रक्रिया,मानसोपचारतज्ञ ,मोफत रक्त तपासणी व एक्स-रे या सर्व तपासण्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत करण्यात येणार असून उपचार ही केले जाणार आहेत.यासाठी लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पंढरपूर ,कदम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अकलूज,रत्नदीप हॉस्पिटल म्हसवड येथील तज्ञ डॉक्टरांची टीम व प्राथमिक आरोग्य केंद्र पिलीव येथील डॉक्टर व सर्व कर्मचारी शिबिरामध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहेत.तरी सर्व ग्रामस्थांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन पिलीव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ विलास जाधव यांनी केले आहे.