पिलीव येथील पञकार संजय पाटील राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजरत्न पुरस्काराने सन्मानित !
पिलीव/प्रतिनिधी
पिलीव येथील पञकार संजय ज्ञानेश्वर पाटील यांनी पत्रकार व समाजकार्यात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत .पुणे येथील शिव प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार 2025 या पुरस्काराने 14 सप्टेंबर रोजी आळंदी येथे शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष मदनजी रेनगडे _ पाटील, सचिव मिरा रेनगडे पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व शिव प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांच्या सन्मानचिन्ह, पुरस्कार पञ व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल पञकार संजय पाटील यांचे शैक्षणिक, राजकीय, सामाजिक ,पञकार, पिलीव येथील माजी विद्यार्थी संघटना आठवणी 95,पिलीव पञकार संघ,ग्रामविकास प्रतिष्ठान तसेच पिलीव परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व कौतुक होत आहेत. चौकट _ पुरस्काराबद्दल संजय पाटील यांना विचारले असता गेली एकवीस वर्षापासून मी पञकारातेची सांगड घालित सर्व सामान्य नागरिक केंद्रबिंदू मानुन जे प्रामाणिकपणे काम केले आहे.याचीच शिव प्रतिष्ठानने दखल घेत माझा जो पुरस्कार देऊन सन्मान केला .या पुरस्कारामुळे मला एक प्रकारची प्रेरणा मिळाली असून माझी जबाबदारी वाढली असून यापुढे सुद्धा पञकार म्हणून सर्व सामान्यांना न्याय देण्याचे काम प्रामाणिकपणे करणार असल्याचे सांगितले. फोटो _ शिव प्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने पञकार संजय पाटील यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करताना.