निमगाव(म)येथील प्रशांत भारत मगर याने एका दलित तरुणाचा घेतला जीव : प्रशांत मगर याच्यावर 302 कलमांतर्गत कारवाई करण्याची मागणी !
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील चांदापूरी येथील गौतम मच्छिंद्र धाइंजे (अंदाजे वय-४०) व त्यांची पत्नी सारिका गौतम धाइंजे हे १६/०७/२०२५ रोजी हे दोघे पती-पत्नी आपले खंडाळी येथील नातेवाईक अकलूज येथील गुजर हॉस्पिटल येथे ऍडमिट असल्याकारणाने त्यांना बघण्यासाठी HF डीलक्स MH 45 W3255 या मोटरसायकल वरून चालले होते.MH 45 U0049 या मोटरसायकल वरून पालखी महामार्ग(निमगाव पाटी) येथील सर्व्हिस रोड वरून जात असताना आऊटसाईडने समोरून दोन मुले भरदाव वेगाने मोटरसायकल वरून आली व गौतम धाइंजे
यांच्या गाडीला समोरासमोर जोराची धडक दिली त्यामुळे
गौतम धाइंजे हे जागेवरच कोसळले व या धडकेत ते गंभीर जखमी झाले तर पत्नी सारिका व पुतणी आरोही या दोघी किरकोळ जखमी झाल्या यावेळी रस्त्यालगत असणारे ग्रामस्थ मदतीला धावून आले व त्यांना जवळच असणाऱ्या निमगाव पाटी येथील दवाखान्यात घेऊन गेले व धडक देणाऱ्या दोन दोन्ही तरुणांना पकडून ठेवले.त्यानंतर सारिका धाइंजे यांनी आपले दिर सिद्धार्थ धाइंजे यांना घडलेली घटना फोनवरून सांगितली असता सिद्धार्थ धाइंजे हे लगेच घटनास्थळी धावून गेले व त्यांना तेथून अकलूज येथील क्रिटिकेअर या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले.सात ते आठ दिवस उलटून गेले तरी गौतम धाइंजे यांच्या प्रकृतीमध्ये काही सुधारणा दिसून येत नसल्याकारणाने पेशंटच्या नातेवाईकांनी धाइंजे यांना डॉ.एम.के इनामदार यांच्या अश्विनी हॉस्पिटल येथे हलविले डॉ.एम.के इनामदार यांनीही पेशंटचा जीव वाचवण्यासाठी अतिशय अतितटीचे प्रयत्न केले परंतु समोरासमोरून जोराची धडक लागल्याने गौतम धाइंजे यांच्या बरगड्या मोडल्या होत्या व त्या फुफ्फुसात घुसल्याकारणाने फुफ्फुस पंक्चर झाले होते त्यामुळे धाइंजे हे अखेर मृत्यूशी झुंज हरले व धाइंजे परिवारावर काळाने घावा घातला.आंबेडकरी चळवळीतील एक दलित समाजाचा ऐन चाळिशीतला तरुण गवंडी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.त्या तरुणाला केवळ निमगाव(म)येथील प्रशांत भारत मगर (दुसऱ्या तरुणाचे नाव समोर आले नाही)याच्या टवाळखोरीमुळे जीव गमवावा लागला असून गौतम धाइंजे यांचे कुटुंब आज उघड्यावर पडले आहे.मयत तरुण हा आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय असल्याने त्याच्या मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून त्याच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या प्रशांत भारत मगर याची सखोल चौकशी करून त्याच्यावर ३०२ कलमांतर्गत कारवाई करण्याची कुटुंबातून समाजातून मागणी होत आहे.
ज्यांनी आम्हाला जाणून-बुजून धडक दिली त्यांची व माझ्या पतीची निमगावच्या पुढे कट मारण्याच्या कारणावरून बाचाबाची झाली होती, त्याचाच मनात राग धरून त्यांनी पुढे येऊन आम्हाला धडक दिली, नंतर त्यांनीच आम्हाला आमचा हात मोडला आहे.आम्हाला पैसे द्या एक्स-रे काढण्यासाठी अशी मागणी केली होती,#सारिका धाइंजे,मयताची पत्नी