पिलीव येथील प्रा.संजय पाटील यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार जाहीर !
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील पत्रकार संजय ज्ञानेश्वर पाटील यांना पुणे जिल्हातील आळंदी देवाची येथील शिव प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत’राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे.
सदरचा पुरस्कार १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता पुणे येथील पत्रकार भवन या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.गेल्या २० वर्षापासून पत्रकारिता तसेच सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल सदरचा पुरस्कार प्रा.संजय पाटील यांना जाहीर करण्यात आला असल्याचे शिव प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.
प्रा.संजय पाटील यांना सदरचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पिलीव पत्रकार संघ,पिलीव येथील माजी विद्यार्थी संघटना,सामाजिक संघटना आठवणी ९५ तसेच पिलीव ,कुसमोड, झिंजेवस्ती परीसरातील शैक्षणिक ,राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, शैक्षणिक क्षेत्रातील मित्र परिवार, माजी विद्यार्थी, नातेवाईक, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडुन या पुरस्काराबद्दल पत्रकार संजय पाटील सर यांचे अभिनंदन करून कौतुक केले जात आहे.