बचेरी येथील श्री.गणेश हणमंतराव पाटील यांच्या सुसज्ज बंगल्याची भव्य अशी वास्तुशांती संपन्न : छतावरती स्विमिंग टॅंक असणारा परिसरातील पहिलाच बंगला !

पिलीव/सुजित सातपुते

सुसज्ज घर ही प्रत्येकाच्या जीवनातील एक स्वप्न असते.जेव्हा आपण नवीन घर बांधतो तेव्हा त्यात प्रवेश करण्यापूर्वी एक धार्मिक विधी केला जातो,ज्याला वास्तुशांती असे म्हणतात.ही पूजा भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाची मानली जाते. हीच भारतीय संस्कृती जपत माळशिरस तालुक्यातील बचेरी येथील युवा उद्योजक श्री.गणेश हनणमंतराव पाटील यांनी आपल्या कष्टातून स्वतःची व परीवाराची स्वप्नपूर्ती केली आहे,पाटील यांनी बचेरीसह पिलीव परिसरातील पहिलाच असा बंगला बांधला आहे कि घराच्या तिसऱ्या माळ्यावरती स्विमिंग टॅंकसह सर्व सुख-सुविधा उपलब्ध असल्याचे पहावयास मिळत आहे,याच आई-बाबा निवास या सुसज्ज बंगल्याची आज शनिवार दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी वास्तुशांती व सत्यनारायणाची महापूजा अतिशय भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडली.


यावेळी हिंदू धर्माच्या परंपरेनुसार लिंगायत गुरूंच्या मंत्रोच्चारात होमहवन, वास्तुशांती पूजा व गृहप्रवेश विधी पार पडली.नव्या घरात सकारात्मक ऊर्जा,समृद्धी आणि शांती नांदावी यासाठी संपूर्ण पूजाविधी पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला.
एक वीट श्रमाची,एक वीट कष्टाची,एक वीट आई- वडिलांच्या आशीर्वादाची,एक वीट बहिणीच्या प्रेमाची,आता एक वीट हवी आपल्या उपस्थितीची असा आमंत्रण पत्रिकेद्वारे अनमोल संदेश देऊन गणेश पाटील यांनी सर्वांना उपस्थित राहण्याची नम्र विनंती केली होती, त्यामुळे सदर कार्यक्रमाला अनेक मान्यवर, नातेवाईक,शेजारी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.नूतन गृहप्रवेशानिमित्त पारंपरिक वेशभूषा,आकर्षक रांगोळ्या, तोरणं आणि फुलांची सजावट यामुळे घराचे वातावरण अधिकच प्रसन्न झाले होते.

वास्तुशांतीनंतर सर्व उपस्थिततांसाठी बचेरी येथील प्रभू श्रीराम यांच्या मंदिरामध्ये पाटील परिवारातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी गणेश पाटील यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले व आज माझी व माझ्या परिवाराची प्रभू श्रीराम यांच्या आशीर्वादाने सुसज्ज असा बंगला बांधण्याची स्वप्नपूर्ती पूर्ण झाली असून घराचा हा खास क्षण आयुष्यभर संस्मरणीय राहील असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *