राज कलेक्शनच्यावतीने सालाबादप्रमाणे स्वातंत्र्य दिनानिमित्त लहान मुलांना खाऊ वाटप !
पिलीव/प्रतिनिधी
आज शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राज कलेक्शन या पिलीव परिसरातील नामांकित कापड दुकानाचे ओनर समीर आमिर सय्यद व मोहसीन अमीर सय्यद या दोन्ही बंधूंनी सालाबादप्रमाणे यावर्षीही सामाजिक बांधिलकी जपत पिलीव परिसरातील कर्मवीर विद्यालय,जवाहर विद्यालय,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व इतर छोट्या-मोठ्या शाळेतील लहान मुलांसाठी खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.सदरच्या खाऊवाटप या कार्यक्रमामध्ये सय्यद बंधू यांचा मित्रपरिवार व राज कलेक्शनचा ग्राहक राजा मोठ्या उत्साहात सहभागी झाला असल्याचे पहावयास मिळाले.मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा हा दरवर्षीचा उपक्रम पाहून विविध शाळेतील शिक्षक,कर्मचारी वृंद व पालक वर्गांकडून आयोजकांचे कौतुक करून आभार मानण्यात आले,“स्वातंत्र्य दिन केवळ राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याचा दिवस नाही,तर समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याची ही संधी आहे” पुढच्या वर्षी मी आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या गरीब,गरजू व होतकरू दोन मुलांना नक्कीच दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च करणार असल्याचे राज कलेक्शनचे ओनर समीर सय्यद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले,
राज कलेक्शनचा हा सामाजिक उपक्रम आदर्श घेण्याजोगा आहे,पिलीव गावातील लोकांनी दरवर्षी स्वातंत्र्य दिन,प्रजासत्ताक दिन किंवा इतर सण उत्सव सामाजिक उपक्रम राबवून साजरे केले पाहिजेत,
ऋषिकेश भैस,पिलीव