बचेरी येथील डोडला दूध संकलन व शीतकरण केंद्रावरती अन्न भेसळ अधिकाऱ्यांचा छापा : छाप्यात आढळले भेसळयुक्त दूध !
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील बचेरी येथे शिंगोर्णी रोड वरती असणाऱ्या डोडला दूध संकलन व शीतकरण केंद्रावरती दूध भेसळ होत असल्याची अन्न व औषध प्रशासन सोलापूर विभागास एक निनावी तक्रार प्राप्त झाल्याने अन्न व औषध प्रशासन सोलापूर विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी डॉ.मंगेश लवटे यांनी व त्यांच्या टीमने छापा टाकला असता सदर छाप्यामध्ये ४० लिटर क्षमतेचे एक कॅन्ड अशी एकूण १५ दुधाची केंडे भेसळयुक्त असल्याची आढळून आली असून त्या भेसळयुक्त दुधाचे सॅम्पल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लॅबला तपासणीसाठी पाठविले असून तपासणीचा अहवाल येत्या दहा ते पंधरा दिवसात आमच्याकडे प्राप्त होईल व त्या अहवालाच्या अनुषंगाने दोषी आढळल्यास डोडला डेरीचे अधिकृत इन्चार्ज सुनील गायकवाड,शिवम रोकडे व राहुल मगर यांच्या वरती आम्ही अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने माळशिरस कोर्टामध्ये खटला दाखल करणार असल्याचे डॉ.लवटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले,

या छाप्यामध्ये डोडला दूध संकलन व शीतकरण केंद्रावरती भेसळयुक्त दूध आढळले असल्याचे समजताच प्रतिक्रिया घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी डोडलाचे इन्चार्ज सुनील गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली असून “मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली” या मराठी म्हणी प्रमाणे आपण किती साजूक आहे असे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न केला,परंतु गेल्या काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीचे नेते व जत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी चक्क विधानसभेतच दुधात कशी भेसळ होते व ती लहान मुलांच्या आरोग्यास किती हानिकारक ठरते याचा प्रयोग करून दाखविला असल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दूध भेसळ करणाऱ्यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे,अशातच बचेरी येथील डोडला दूध संकलन व शीतकरण केंद्रावरती भेसळ होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यातून उघड झाले असल्याने या डोडला डेरीच्या विरोधात बचेरीसह पिलीव परिसरातील लोकांच्या मधून तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे पहावयास मिळत आहे.सदरचे डोडला दूध संकलन केंद्र त्वरित बंद करावे अन्यथा अन्न व औषध निर्माण मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे डोडला दूध संकलन व शीत केंद्राचे संबंधित अधिकारी,अन्न व औषध प्रशासनाचे संबंधित अधिकारी यांची रीतसर तक्रार करणार असून त्यांच्या फोटोसहीत नावांचे बोर्ड छापून येत्या १५ ऑगस्ट २०२५ रोजी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कार्यालयासमोर संबंधित अधिकाऱ्यांच्या नावाने तीव्र निदर्शने करणार असल्याचा महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीचे माळशिरस तालुकाध्यक्ष सुजित सातपुते यांनी संबंधित अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे,त्यामुळे बचेरीसह पिलीव परिसरातील सर्वच लोकांचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लक्ष लागून राहिले आहे,
भेसळुक्त दुधामुळेच महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारतभर कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे,दूध भेसळ करणाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी जो कायदा आणला आहे त्या कायद्यांतर्गत संबंधितावर कठोर कारवाई झाली पाहिजे,
#डॉ.कुमार लोंढे
सेंट्रल ह्यूमन राईट संघटन,दिल्ली