राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाची धडक कारवाई : अकलूज येथील बनावट मद्य कारखान्यावर मारला छापा !

पिलीव/प्रतिनिधी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, माळशिरस विभाग सोलापूर यांनी दि. 23.07.2025 रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क,माळशिरस विभाग जि. सोलापूर व सर्व स्टाफ यांनी मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार, गोवा राज्य निर्मीत अवैद्य दारुची वाहतूक होत असल्याची खात्रीलायक माहिती समजले वरून सदर माहितीच्या अनुषंगाने निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, माळशिरस विभाग सोलापूर या पथकाने गुन्ह्याच्या ठिकाणी अचानकपणे छापा घातला

असता अवैद्य बनावट मद्याची वाहतूक करत असताना सदर ठिकाणी गोवा राज्य निर्मात महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंध असलेले मद्य विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगणे व वाहतूक करताना तसेच होन्डा कंपनीची ॲक्टीव्हा मॉडेलची दुचाकी क्र. MH-45-AT-5840 हे वाहन तसेच स्पिरीट, बनावट लेबले, बुचे, सिलींग मशीन व रिकाम्या बाटल्या असा एकूण रु. 1,26,350/- किंमतीचा मुद्देमाल वाहनासह दोन आरोपी नावे 01 माधव अरुण पवार, वय ३२ वर्षे राहणार- चोभेपिंपरी ता. माढा, जि. सोलापूर 02. सतीश नागनाथ शिंदे वय ४१ वर्षे रा. देवकते वस्ती जुना बारलोणी रोड कुडूवाडी ता. माढा, जि. सोलापूर यांना अटक करुन प्रो. गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक सचिन भवड करीत आहेत.

अकलूज शहर ता. माळशिरस जि. सोलापूर येथे बनावट मद्य कारखान्यावर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, माळशिरस विभागाची धडक कारवाई !

याबाबत सविस्तर वृत्त असे की, माळशिरस विभाग सोलापूर यांनी दि. 08.07.2025 रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, माळशिरस विभाग जि. सोलापूर व सर्व स्टाफ यांनी मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार, गोवा राज्य निर्मीत अवैद्य दारुची वाहतूक होत असल्याची खात्रीलायक माहिती समजले वरून सदर माहितीच्या अनुषंगाने निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, माळशिरस विभाग सोलापूर या पथकाने गुन्ह्याच्या ठिकाणी अचानकपणे छापा घातला असता अवैद्य बनावट मद्याची वाहतूक करत असताना सदर ठिकाणी गोवा राज्य निर्मीत महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंध असलेले मद्य विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगणे व वाहतूक करताना तसेच होन्डा कंपनीची ॲक्टीव्हा मॉडेलची दुचाकी क्र. MH-45-AN-4473 हे वाहन तसेच गोवा राज्य निर्मात मद्य, बनावट मद्या, बुचे, व रिकाम्या बाटल्या असा एकूण रु. २,७७,९६०/- किंमतीचा मुद्देमाल वाहनासह दोन आरोपी नावे 01 शिवराज उदय रिसवडकर वय 19 वर्षे राहणार- अकलूज ता. माळशिरस जि.सोलापूर 02. आकाश भागवत माळी रा.धाराशिव, जि.धाराशिव यांना अटक करुन प्रो. गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री.सौरभ भोसले हे करीत आहेत.
वरील दोन्ही गुन्ह्यात मिळून स्पिरीट 30 लिटर, गोवा राज्यातील मद्य 153 ब.लि., बनावट मद्य 89.1 ब. लि. बनावट 1500 बुचे, बनावट लेबले 1300, दोन सिलींग मशीन, दोन दुचाकी वाहने, व इतर असा एकूण रु. 4,04,310/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरील कारवाईच्यावेळी निरीक्षक सचिन भवड, दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे, सौरभ भोसले, रविंद्र भुमकर, स.दु.नि. एस.ए. बोराजदार, जवान वाय.ए.पाटील, जी.एस. जाधव, पी.डी. पुसावळे, डी.ए.चौधरी, आर.एस. लोखंडे जवान नि. वाहन चालक एम.एस. जडगे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *