पिलीव येथील”अक्षय हार्डवेअर”बैल सजावटींच्या वस्तूंनी चकाकले : सजावटींमुळे बैल धारकांची खरेदीसाठी झुंबड !
पिलीव/सुजित सातपुते
बेंदूर हा महाराष्ट्रतील शेतकरी समाजामध्ये साजरा होणारा एक अत्यंत महत्त्वाचा कृषी सण आहे,विशेषतः बैलांची पूजा करून त्यांच्या श्रमाचे आणि योगदानाचे स्मरण करणारा हा सण शेतकऱ्यांसाठी भावनिक आणि धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातो, शेतकऱ्यांमध्ये बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो.बैल हे शेतकऱ्यांचे जीवनसाथी असून त्यांची मेहनत शेतीसाठी अनमोल असून बेंदूर सणामुळे आपल्या पारंपरिक कृषी संस्कृतीचे दर्शन घडते.

सणाच्या माध्यमातून शेतकरी आणि बैल यांच्यातील नातं अधोरेखित होतं याच अनुषंगाने माळशिरस तालुक्यातील पिलीवसह परिसरामध्ये काही भाग वगळता बुधवार दिनांक ९ जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्रीयन बेंदूर सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत रंगीबेरंगी सजावटीचे साहित्य जोरात खरेदीसाठी आले असल्याचे पहावयास मिळत आहे,रेशिम,नायलॉन,मोत्यांच्या माळा,घुंगरू पट्ट्या इत्यादींना बैलधारक शेतकऱ्यांकडून विशेष मागणी होत आहे,रेशीम व नायलॉन सजावटींमुळे शौकिनांचा आधुनिक कल दिसून येत असून पुरवठा पुरेसा असल्याने आणि दर जास्त नसल्याने बैलधारक यांच्यामधून समाधान व्यक्त होत आहे,पिलीव येथील म्हसवड-पंढरपूर रोड वरती बँक ऑफ इंडियाच्या समोर असणाऱ्या”विठ्ठल काशिनाथ देशमुख”यांच्या अक्षय हार्डवेअर या दुकानांमध्ये ३५ ते ४० प्रकारच्या सजावटीच्या साहित्यांचे प्रकार अल्प दरात विक्रीस मांडण्यात आले आहेत,गोंडे,कवड्या,झुली, लहान-मोठे घुंगरू लावलेले बेल्ट,नायलॉन रस्सी,सुताची रस्सी,चाबूक,शिंगाना लावण्यासाठी रंगबिरंगी बेगड यासह ट्रेंडनुसार नवीन कलरफुल डिझाइन आमच्या दुकानात पशुपालक शेतकऱ्यांसाठी अगदी माफक दरात उपलब्ध असल्याचे अक्षय हार्डवेअरचे मालक विठ्ठल देशमुख यांनी माळशिरस टाईम्सशी बोलताना सांगितले,
बेंदूर सण म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नसून श्रम,नातेसंबंध, निसर्ग व परंपरेचे एक सजीव प्रतीक आहे,तो शेतकऱ्यांच्या आयुष्यातील एक आनंदाचा व समाधानाचा सण आहे, त्याच सणाचे औचित्य साधून अक्षय हार्डवेअर येथे बैलांच्या सजावटींचे सर्व साहित्य अगदी माफक दरात मिळत आहे,त्यामुळे आम्ही दरवर्षीपेक्षा यावर्षी बैल सजावटीचे भरपूर साहित्य खरेदी केले आहे,
राजेंद्र महानवर,बैलधारक शेतकरी