श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पालखीचे पिलीव येथे जेऊरकर परिवाराच्या वतीने जंगी स्वागत. !

पिलीव/ सुजित सातपुते

गोंदवलेच्या श्रीरामाचा जय-जयकार
पावन झाले जीवन सार्थक संसार !

नाम घेतले त्याचे,संकटे हरपती
प्रेमाने ओवाळी,भक्तांसाठी !

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची पालखी ही त्यांच्या भक्तांसाठी विशेष श्रद्धेची आणि आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत महत्वाची असते. ती वारकरी परंपरेच्या आधारावर गोंदवले,म्हसवड,पिलीव,भाळवणी,पंढरपूर या मार्गाने गेली कित्येक वर्षापासून अखंडितपणे पायी वारी स्वरूपात काढली जाते.पिलीव गावचे ग्रामपंचायत सदस्य अविनाश देविदास जेऊरकर यांनी त्याच पायी वारीचे म्हणजेच श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पालखीचे पिलीव गावात अगमन होताच अगदी भक्तिमय वातावरणात फुलांचा वर्षाव करून फटाक्यांची आतशबाजी करत ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत केले व पालखी सोहळ्यातील विणेकरी,टाळकरी व दिंडीतील इतर विश्वस्तांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान केला,

यावेळी बसस्थानक परिसरामध्ये उभे रिंगण करण्यात आले,हे उभे रिंगण पाहण्यासाठी लहान मुला-मुलींपासून ते वृद्ध,महिला,पुरुष यांनी एकच तोबा गर्दी केली होती,या गर्दीने अखंड पिलीव गाव भक्तीमय झाल्याचे पहावयास मिळाले,अविनाश जेऊरकर व अनिता जेऊरकर हे दांपत्य श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पालखीचे अखंडितपणे गेली कित्येक वर्षापासून पिलीव गावात जंगी स्वागत करत आले असून त्यांनीच पिलीव येथे उभ्या रिंगण सोहळ्याची प्रथा सुरू केली आहे,त्यामुळे पिलीवसह पंचक्रोशीतील लोकांना नयनरम्य असा उभा रिंगण सोहळा पाहण्याचे भाग्य लाभत असल्याचे उपस्थितांकडून बोलले जात होते,

अविनाश जेऊरकर यांच्या पुढाकाराने पिलीव गावामध्ये श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पालखीतील अश्वांचा उभा रिंगण सोहळा पार पडतो,ते आम्हाला पहावयास मिळते ते आम्ही आमचे भाग्यच समजतो,

अभिजीत ऐवळे,पिलीव

          

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *