मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेने कसल्याही प्रकारची प्रवेश फी घेऊ नये,अन्यथा कारवाई अटळ – वैभव गीते

पिलीव/प्रतिनिधी
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,भटक्या विमुक्त व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शाळा महाविद्यालय भरमसाठ फी आकारात आहेत. अशी तक्रार जिल्हाधिकारी व संबंधित कार्यालय प्रमुखांकडे केली आहे.याची दखल घेऊन जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांनी आदेश काढलेले आहेत.त्यामुळे आम्ही सोलापूर जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे राज्य सचिव वैभव गीते यांनी प्रसारमाध्यमांच्याद्वारे आभार मानले आहे,जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याशी माझी चर्चा झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी सोलापूर यांनी सर्व प्राचार्य/अधिष्ठता कनिष्ठ/वरीष्ठ/व्यवसायिक/तांत्रिक/बिगर व्यवसायिक महाविद्यालये यांना अनुसूचित जातीच्या कोणत्याही विद्यार्थ्याकडून कसल्याही प्रकारची फी वसूल करू नये.आणि फी मागितल्याची तक्रार प्राप्त झाल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांनी सर्व महाविद्यालयांना दिला असल्याचे गीते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले,
महाराष्ट्रातील नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी,नेत्यांनी आपल्या सभोवतालच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांनी फी वसूल करू नये.तसेच सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार प्रवेश मिळतील कोणत्याही विद्यार्थ्यांचे गैरसोय होणार नाही यासाठी एन.डी.एम.जे संघटनेच्या नेत्यांनी विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करावयाची आहे. असेही वैभव गीते यांनी महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सुचित केले असल्याचे सांगितले,

आज मी इयत्ता बारावी मध्ये शिकत आहे परंतु आजपर्यंत वैभवजी गीते साहेब यांच्यामुळे मला बारावीपर्यंत कुठेही कोणत्याही शाळेत प्रवेश फी आकारली नाही,गीते साहेबांमुळे महाराष्ट्रातील अनेक मागासवर्गीय मुलांना मोफत प्रवेश मिळत आहे,

अजय बाळकृष्ण लांडगे,विद्यार्थी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *