डॉ.महेश करे यांचा वैद्यकीय परवाना बडतर्फ करण्याची मागणी : पंधरा महिन्याच्या आराध्याचा एक हात कायमचा गमावला..!

पिलीव/सुजित सातपुते

यशवंत प्रकाश नरुटे रा.काझड,ता.इंदापूर,जि.पुणे यांची पत्नी गौरी यशवंत नरुटे यांचे माहेर माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी असून गौरी नरुटे या माहेरी असतानाच त्यांच्या अवघ्या १८ महिन्याच्या आराध्या नावाच्या मुलीला दिनांक २८/०२/२०२५ रोजी कफ होऊन धाप लागू लागली व थंडी ताप आला म्हणून नातेपुते येथील डॉ.महेश पोपट करे यांच्या रुग्णालयात त्या आपल्या मुलीला घेऊन गेल्या डॉ.करे यांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर बाळाची रक्त लघवी तपासण्यासाठी लॅब मध्ये पाठवली व आराध्याला ॲडमिट करण्याचा सल्ला दिला.

रात्रीची वेळ असल्याने व डॉक्टरांनी पुढे कुठेही जाण्याचा सल्ला न दिल्याने आराध्याला त्या ठिकाणी ॲडमिट केले.सकाळी जेव्हा आराध्याचे वडील यशवंत नरुटे आपल्या मुलीला बघण्यासाठी डॉ.करे यांच्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मुलीच्या हाताला जिथे सलाईन लावली आहे त्या ठिकाणी सूज आल्याचे दिसून आले त्यानंतर त्यांनी लगेचच डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिले.तेव्हा डॉक्टरांनी मुलगी लहान आहे त्यामुळे थोडी सूज आहे काही काळजी करू नका असे सांगितले.

परंतु दुसऱ्या दिवशी ही मुलीच्या डाव्या हाताला खूप सूज आलेली होती ज्या ठिकाणी सुई लावलेली होती त्या ठिकाणी रक्त साकळलेले दिसल्याने डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिले.डॉक्टरांनी काही होत नाही असे सांगून त्या ठिकाणची सुई काढून उजव्या हाताला सुई लावली परंतु डावा हात सुजतच गेला त्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना विनंती केली असता डॉक्टरांनी कसला तरी मलम लिहून दिला व त्याच दिवशी रुग्णाला घरी जाण्याचा सल्ला दिला.घरी आल्यानंतर डॉक्टरने दिलेला मलम लावल्यानंतर मुलीचा हात निस्तेज होऊन निकामी व्हायला लागला होता असे आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही डॉ.महेश करे यांच्याकडे चौकशी केली असता डॉ.करे यांनी उडवा-उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.आम्ही डिस्चार्ज समरी रिपोर्ट घेण्यास गेलो असता डॉ.करे यांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून आम्हाला दवाखान्याच्या बाहेर हाकलून काढले.मुलीच्या हाताचा प्रश्न असल्याने आम्ही याबाबत नंतर चौकशी करूया असे म्हणून माळशिरस येथील बालरोग तज्ञ डॉ.वाघमोडे यांच्याकडे गेलो त्यांनी उपचार करून बारामती येथील डॉ. मुथा यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. डॉ. मुथा यांनी प्रथमोपचार केल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात संपूर्ण तपासण्या केल्या असता केवळ डॉक्टरच्या चुकीच्या औषध उपचारामुळे या लहान बाळाचा हात निकामी झाला आहे असा निष्कर्ष निघाला.त्यामुळे डॉ.महेश करे यांची व त्यांच्या रुग्णालयात कार्यरत सर्वच कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय पदव्यांची,अधिकारांची चौकशी करावी व माझ्या मुलीला कायमस्वरूपी अपंगत्व येण्यासारखा चुकीचा उपचार केला म्हणून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचा वैद्यकीय सेवा परवाना तातडीने बडतर्फ करण्यात यावा आणि शासनाच्या वतीने माझ्या मुलीला नुकसान भरपाई मिळावी अशा आशयाचे निवेदन मुलीच्या नातेवाईकांनी तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांच्यापासून ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यापर्यंत कार्यालयापर्यंत दिले आहे.

सदर प्रकरणी डॉ.महेश करे यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा वार सोमवार दिनांक २६/५/२०२५ रोजी सकाळी १०:३० वा.आरोग्य उपसंचालक पुणे यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना इशारा दिला आहे

#आपण समोर बोलूया.मी ऑल रेडी प्रतिक्रिया दिली आहे कोणत्यातरी एका न्यूजला.त्याच्यामध्ये काय बोलण्यासारखं नाही आपली काही चूक नाही.या प्रकरणांमध्ये आपला काही रोल नाही.
#डॉ. महेश करे,नातेपुते

      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *