माळशिरस तालुक्यातील तीन बड्या डॉक्टरांवर कारवाईची टांगती तलवार : महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार करण्यास टाळाटाळ करणे भोवणार
पिलीव/सुजित सातपुते
इंदापूर तालुक्यातील लिंबोडी गावचे महिंद्रा अजिनाथ बनसोडे या पेशंटला त्याचे दाजी शंकर मस्के (रा. अकलूज) हे महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार करण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन गेले होते परंतु कदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अकलूज,अकलूज क्रिटिकल केअर & ट्रॉमा सेंटर व स्टार आय.सी.यू अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल माळशिरस या रुग्णालयांनी रुग्णावर उपचार करण्यास टाळाटाळ केली होती.शेवटी त्या पेशंटला सोलापूर येथे उपचार करण्यात आले, सदर पेशंटची वरील हॉस्पिटलमध्ये हेळसांड झाली असल्याने संबंधित डॉक्टरवर सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी व त्यांच्या दवाखान्यातून महात्मा फुले जन आरोग्य योजना तात्काळ बंद करावी या मागणीसाठी माळशिरस तालुका रुग्ण हक्क समितीच्यावतीने अकलूज येथील उपविभागीय कार्यालयासमोर आज गुरुवार दिनांक ८ मे २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून पासून अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात आले आहे,दोषी डॉक्टरांवर कारवाई न झाल्यास संबंधित हॉस्पिटला रुग्णहक्क परिषदेच्या वतीने टाळे ठोकण्यात येतील असा इशारा आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते विकास धाईंजे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या वतीने देण्यात आला आहे,संबंधित हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत एखादे गोर-गरीब व गरजू पेशंट ॲडमिट झाले असता त्याच्याकडूनही पैसे घेतले जातात व शासनाचेही अनुदान लाटले जाते असा गंभीर व खळबळ जनक आरोप अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते महेश केशव शिंदे यांनी केला आहे.या अन्न त्याग उपोषणास महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक दीपक वाघमारे यांनी भेट देऊन कारवाईचे आश्वासन दिले.त्यामुळे वरील दोषी डॉक्टरांवर काय कारवाई होणार याकडे संपूर्ण माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.या अन्नत्याग उपोषणावेळी रिपाईचे किरण धाईंजे,विशाल साळवे,साजिद सय्यद, जुल्कर शेख,संतोष कांबळे,सौरभ वाघमारे,अभिजीत केंगार यासह माळशिरस तालुक्यातील विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#आजच्या आणत्याग उपोषणास जिल्हा समन्वयक दीपक वाघमारे यांनी भेट दिली परंतु त्यांनी समाधानकारक लेखी आश्वासन न दिल्याने मी उपोषण सोडले नाही,
महेश शिंदे,अकलूज