पिलीव गावची “शरण्या सुरज खलीपे” ठरली सिल्वर मेडलची मानकरी : प्रसन्न ऑलिंपियाड नवोदय फाउंडेशन परीक्षेत घवघवीत यश..!
पिलीव/सुजित सातपुते
प्रसन्न ऑलिंपियाड नवोदय फाउंडेशन परीक्षेत माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकत असणाऱ्या शरण्या सुरज खलीपे या चिमुकलीने जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवून अगदी लहान वयातच सिल्वर मेडल प्राप्त केले आहे.शरण्याही नुकतीच इयत्ता दुसरी मध्ये प्रत्येक विषयात अ श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाली आहे.इयत्ता दुसरीच्या जिल्हा यादीमध्ये तिने चौथा क्रमांक मिळवून पिलीव गावच्या शिरपेच्यात एक मानाचा तुरा रोवला आहे.वर्गातील एक शांत,संयमी व हुशार मुलगी असून तिची शिक्षणाच्या बाबतीत खूप एकाग्रता असल्याचे तिच्या बोलण्यातून दिसून येते.शरण्याच्या या यशाबद्दल तिचे पिलीवसह परिसरातून कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत असल्याचे पहावयास मिळत आहे.शरण्याच्या या दैदीप्यमान यशाबद्दल तिचे वडील सुरज बाळकृष्ण खलीपे यांना आमच्या प्रतिनिधीने विचारणा केली असता शरण्याच्या या यशाचे सर्व श्रेय हे तिच्या वर्गशिक्षिका श्रीमती वैशाली भागवत मॅडम यांना जात असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
शरण्या या नावाचा मराठी अर्थ जो आश्रय देतो किंवा जो संरक्षण करतो असा होतो. त्यामुळे शरण्याही भविष्यात मोठी अधिकारी बनेल व गोरगरीब,वंचित,शोषित,पीडित, अन्यायग्रस्तांना न्याय देऊन आश्रय देईल यात तीळमात्र शंका नाही.
“मंगल बा.खलीपे”,आजी