पिलीव गावची कु.शौर्या विजय ठेंगल राज्यात प्रथम : या अगोदरच्याही प्रत्येक परीक्षेत अव्वल.. !

पिलीव/सुजित सातपुते

शौर्या या शब्दाचा मराठी अर्थ धैर्य,वीरता किंवा धाडस असा होतो.म्हणजेच कठीण परिस्थितीत किंवा धोक्याच्या वेळी धाडसाने आणि निर्भीडपणे वागणे किंवा योग्य निर्णय घेणे.असाच योग्य व निर्भीडपणे निर्णय घेत पिलीव येथील जि.प.प्रा शाळा येथे इयत्ता दुसरीत शिकत असलेल्या शौर्या विजय ठेंगल या चिमुकलीने आपल्या गावाचे,आई-वडिलांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व स्वतःचे राज्याच्या नकाशात नाव कोरले आहे.अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षा सन-२०२५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये कु.शौर्या ठेंगल हिने १५० पैकी १५० मार्क मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकविला आहे.आज अखेरपर्यंत घेण्यात आलेल्या लहान-मोठ्या परीक्षांपैकी शौर्याने कधी केंद्रात कधी तालुक्यात कधी जिल्ह्यात तर कधी राज्यात आपले नाव गुणवत्ता यादीत झळकविले असल्याचा जणू विक्रमच केला आहे की काय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.एखाद्या टिपकागदाप्रमाणे ही चिमुकली शौर्या आजूबाजूचे सगळे चांगले-वाईट विचार शोषून घेते.तिच्या मनावर चांगले संस्कार झाले असून तिचे विचारही चांगले असल्याचे दिसून येत आहे.लहान मुलांच्या आजूबाजूचे वातावरण वाईट असले तर त्यांच्या मनावर वाईट प्रभाव पडतो व त्यांचे पुढचे सगळे आयुष्य खराब होण्याची शक्यता असते.म्हणूनच या वयात विद्यार्थ्यांनी उत्तम साहित्य वाचले पाहिजे.त्यांच्या मनावर चांगले संस्कार होतील अशी चांगली पुस्तके वाचली पाहिजेत,चांगले ऐकले पाहिजे,बोलले पाहिजे.त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या शिक्षक तसेच पालकांनीही हे गांभीर्य ठेवले पाहिजे की आपण एक नवी पिढी घडवतो आहोत.ही नवी पिढी जर चांगली घडावी असे वाटत असेल तर विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले तेच बिंबवले गेले पाहिजे असल्याचे शौर्याचे वडील विजय ठेंगल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

कु.शौर्या विजय ठेंगल कुशाग्र,अभ्यासू,दररोज सर्व घरचा अभ्यास पूर्ण करणारी,सांगितलेले पाठांतर वेळीच पूर्ण करणारी अशी ही एक होत करू व हुशार मुलगी असून तिच्यात एक भविष्यातील मोठा अधिकारी दडलेला आहे.

श्रीमती वैशाली भागवत

वर्गशिक्षिका

    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *