पिलीव येथील तीन विद्यार्थ्यांची कराटे या खेळात नॅशनल स्पर्धेसाठी निवड..!
पिलीव/प्रतीनिधी
आपल्या देशात अनेक खेळ खेळले जातात.आपल्या जीवनातील खेळाचे महत्व प्रत्येकाला माहित आहे.यांपैकी काही खेळ मैदानी तर काही घरात बसून खेळले जातात. कबड्डी,खो-खो,बेसबॉल हे खेळ आपणा सर्वांना माहित आहेत.परंतु काही खेळ असे आहेत जे फक्त खेळ नसून आपल्याला लढायला शिकवतात.किंबहुना आपला बचाव करतात.असाच एक खेळ ज्याचे प्रशिक्षण स्वयं रक्षणाकरिता घेतले जाते आणि ज्याच्या विविध स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात तो खेळ म्हणजे कराटे या खेळाचा पिलीव सारख्या ग्रामीण भागात उगम पावला म्हणजे तो वाजिद बशीर शेख यांच्या संकल्पनेतून,अगदी मापक व अल्प फी घेऊन लहान मुलांपासून ते मोठ्या मुलापर्यंत वाजिद शेख अनेक वर्षांपासून अखंडितपणे कराटे क्लास पिलीव मध्ये घेत असल्याचे पहावयास मिळत आहे, त्याचीच एक पोहोच पावती म्हणून पिलीव येथील तीन खेळाडूंची राष्ट्रीय लेव्हलला निवड झाली आहे,इंडिया तायक्वांदो कडून घेण्यात येणाऱ्या फेडरेशन कप या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यातील पिलीव येथील लोकसेवा तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमीतील विद्यार्थिनी तमसिन वाजिद शेख कॅडेट वजनी गटात तसेच ज्युनिअर वजनी गटात शिवतेज आप्पासाहेब लोखंडे,सीनियर वजन गटात शुभम मच्छिंद्र जाधव या खेळाडूंची २५ एप्रिल २०२५ ते २९ एप्रिल २०२५ नाशिक येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे पिलीवसह परिसरातील विविध सामाजिक व राजकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शक शिक्षक वाजिद शेख आणि विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तसेच सोलापूर जिल्ह्याचे तायक्वांदो असोसिएशनचे सचिव प्रमोद दौंडे सर,महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे महासचिव गफार पठाण सर यांनीही ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी आपल्या गावाचे व परिवाराचे नाव राष्ट्रीय लेव्हला नेऊन पोहोचवले असल्याने त्यांचा अभिमान वाटतोय असे गौरव उद्गार काढून अभिनंदन करून पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या,
माझ्या आई-वडिलांचे स्वप्न आहे की मी एक टॉपचा कराटे मॅन बनावं,त्यामुळे जगातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा असणारी दि कराटे वर्ल्ड चॅम्पियनशिप इथपर्यंत भविष्यात मी नक्कीच मजल मारीन व आई-वडिलांचे स्वप्न साकार करीन,
शिवतेज लोखंडे,पिलीव