पळशी गावचे सुपुत्र परिचारक परिवाराचे निष्ठावंत कार्यकर्ते “मनोहर प्रल्हाद माने” यांचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून अभिनंदन..!
पिलीव/सुजित सातपुत
प्रशांत मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रणव मालक परिचारक यांच्या नेतृत्वाने पळशी गावचे सुपुत्र मनोहर प्रल्हाद माने व त्यांचे मोठे बंधू पळशी गावचे माजी उपसरपंच कांतीलाल प्रल्हाद माने या दोघा भावांनी रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व या उपक्रमांतर्गत स्वतःच्या रेफरल कोड वरती तब्बल११११ लोकांना भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्वामध्ये सदस्य म्हणून सामील करून घेतले आहे,

त्यांना भारत देशाच्या पुनर्निर्मानीच्या प्रवासात सहभागी करून घेतल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे एका छोट्याशा गावातील कार्यकर्त्याची पक्षाबद्दलची असणारी तळमळ व निष्ठा बघून आपल्या स्वतःच्या लेटर पॅड वरून पत्रव्यवहाराद्वारे मनोहर माने यांचे अभिनंदन करून आभार मानले आहे,हे सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, भाजपाचे सांगोला तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर,मा.जिल्हा परिषद सदस्य तानाजीराव वाघमोडे, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब (दादा) यलमार, पळशी गावचे सरपंच आकाश वाघमारे,मा.चेअरमन रघुनाथ तात्या झांबरे, मा.संचालक दिगंबर वाघमारे, युवा नेते विजय राजमाने,चेअरमन सोमनाथ मोरे, रामभाऊ वाघमोडे सरपंच सिद्धेश्वर लोखंडे आबासाहेब मोरे नागेश झांबरे विलास यलमार भगवान वाघमारे मामा खरात रोहन यलमार इत्यादींचे सहकार्य लाभले असून एवढ्यावरच शांत बसणार नसून प्रशांत मालक व प्रणव मालक यांच्या मार्गदर्शनाखाली
“हर घर भाजपा” या उपक्रमांतर्गत पंढरपूर तालुक्यातील खेड्यापाड्यातील व वाड्या वस्तीवरील प्रत्येक घरात भाजपचा किमान एक तरी सदस्य तयार करणार असल्याचे मनोहर माने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले,