बचेरी येथे कै.मच्छिंद्र मामा खुर्द वाचनालयाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन : पत्रकार संजय पाटील यांना ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर..!
पिलीव/प्रतिनिधी
कै.मच्छिंद्र मामा खुर्द यांची 84 वी जयंती व कै.मच्छिंद्र मामा खुर्द वाचनालयाच्या 25 वा वर्धापन दिनानिमित्त बचेरी ता.माळशिरस येथे रविवार दि १६ फेब्रुवारी २०२५ रोजी ग्रंथमित्र पुरस्कार वितरण व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष सदाशिव शिंदे यांनी दिली.यावेळी उपाध्यक्ष दत्तात्रय यादव,सचिव हैबत शिंदे उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजयकुमार पवार,रणधैर्य सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल विलास कदम,विठ्ठल दयाजी विद्यालय सुळेवाडी च्या मुख्याध्यापिका अश्विनी शेंडगे व पिलीव येथील पत्रकार संजय पाटील यांना ग्रंथ मित्र पुरस्कार जाहीर झाला असून नुकतीच मुंबई पोलीस पदी निवड झालेल्या काजल कोकरे व प्रियांका बरकडे या विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव होणार आहे,कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्रीनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेज तरंगफळचे प्राचार्य संतोषकुमार शेंडगे तर मुख्याध्यापक जगदीश गोडसे यांच्या अध्यक्षेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमासाठी सर्व नागरिक व विद्यार्थी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कै.मच्छिंद्र मामा खुर्द सार्वजनिक वाचनालय बचेरीचे अध्यक्ष सदाशिव शिंदे,दत्तात्रय यादव,हैबत शिंदे यांनी केले आहे.