बचेरी येथे अनैतिक संबंधातून खून : आरोपीस जन्मठेप व 1000 रुपयाचा दंड..!
पिलीव / प्रतिनिधी
माळशिरस पोलीस ठाणे गु.र.नं 346 / 2018 भादवी कलम 302 प्रमाणे दि. 02/10/2018 रोजी सदरचा गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यातील आरोपी महादेव विष्णु थिटे वय 52 वर्षे रा. बचेरी ता.माळशिरस याने त्यांची पत्नी सिताबाई महादेव थिटे व यातील मयत मंगल शहाजी थिटे हीचे पती शहाजी अगतराव थिटे यांचे अनैतिक संबंध होते. याचा राग मनात धरुन दि. 01/10/2018 रोजी रात्रौ 12 ते 1 वा.चे दरम्यान यातील आरोपीने त्याचा चुलत भाऊ शहाजी थिटे यास व त्याचा भाऊ यास कायमचे संपवुन टाकायचे या इराद्याने घरातील कु-हाड घेवुन शहाजी राहत असलेल्या वस्तीवर जावुन घरासमोर शहाजी व त्याची पत्नी तसेच मुलगा संतोष असे सर्वजण झोपले असताना त्यावेळी यातील मयत मंगल ही कशाला तरी उठुन घराचे बाजुला जात असल्याचे पाहुन यातील आरोपी अंधारात उभा होता त्यावेळी यातील मयताने पाहुन आरडाओरडा करु नये म्हणुन आरोपी मयताचे डोक्यात लोखंडी कु-हाड घालुन जिवे ठार मारुन तेथुन पळुन गेला, अशी फिर्याद दत्तु शहाजी थिटे वय 27 धंदा शेती रा. थिटे वस्ती बचेरी ता. माळशिरस यांनी माळशिरस पोलीस ठाणेस दिली होती. सदर गुन्ह्याचा तपास तात्कालीन पोलीस निरीक्षक विश्वभंर गोल्डे माळशिरस पोलीस ठाणे यांनी केला होता. सदर केसचा निकाल आज दि. 28/01/2025 रोजी लागला असुन सदर गुन्ह्यातील आरोपी महादेव विष्णु थिटे यास मा. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. एल.डी.हुली सो यांनी जन्मठेप व 1000 रु दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदर केसमधे सरकारी अभियोक्ता म्हणुन एस. एस. पाटील सो यांनी काम पाहीले. तसेच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर,पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सदर केसमधे योग्य ते मार्गदर्शन केले आहे.तसचे कोर्ट पैरवी,पोसई संजय कपडेकर, सपोफौ पाडुळे व पोना / 746 माने यांनी काम पाहीले,