संग्रामसिंह जहागीरदार यांच्या पाठपुराव्याला यश..!

पिलीव /प्रतिनिधी
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या निधीतून व संग्रामसिंह जहागीरदार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पिलीव अर्बन गावठाण काळा मळा,शिक्षक कॉलनी,विद्यानगर परिसर या ठिकाणची लाईन जोडून ५ पोलची मेन लाईन टाकण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या निधीतून सदरचे काम मार्गी लावले आहे.

त्यामुळे वेळोवेळी खंडित होत असणारा वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला आहे,पिलीव येथील काळामळा परिसर,शिक्षक कॉलनी, विद्यानगर परिसर मधील रहिवाशांना आता पिलीव गावठाण प्रमाणे २४ तास लाईट मिळत असून येथील सर्व नागरिकांची बऱ्याच वर्षापासूनची हेळसांड व त्रास दूर झाला आहे,त्यामुळे येथील सर्व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील मोहिते पाटील व संग्रामसिंह जहागीरदार यांच्या बद्दल लोकांमधून समाधान व्यक्त होत आहे,

    चौकट - विजेचे खांब मंजूर नसल्याकारणाने आमच्या काळा माळा या परिसरामध्ये गावठाण फीडर चालू नव्हता,त्यामुळे नियमित वीज पुरवठा होत नव्हता परंतु सध्या आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व संग्रामसिंह जहागीरदार यांच्यामुळे नियमित वीजपुरवठा होतोय त्याचा आनंद आहे,
           नवनाथ पिसे, पिलीव 
           
     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *