सालाबाद प्रमाणे राज कलेक्शनच्या वतीने पिलीव परिसरातील सर्व शाळांना खाऊ वाटप..!
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील मेन पेठेमध्ये आंधळकर चौक येथे असणाऱ्या राज कलेक्शनचे सर्वेसर्वा समीर सय्यद व मोहसीन सय्यद यांच्या वतीने 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सालाबाद प्रमाणे परिसरातील सर्व शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना म्हणजेच अंदाजे अडीच हजार विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिन हा आनंदाचा व गोड दिवस असल्याने विद्यार्थ्यांचे तोंड गोड व्हावे या हेतूने गोड खाऊचे वाटप करण्यात आले,

समीर सय्यद व मोहसीन सय्यद हे दोन्ही बंधू प्रत्येक लोकशाहीच्या उत्सवात अगदी मनोभावे सामील होऊन आनंद उत्सव साजरा करत असल्याचे पहावयास मिळत असते, 15 ऑगस्ट,26 जानेवारी,1 मे रोजी असणारा महाराष्ट्र दिन, 26 नोव्हेंबर रोजी असणारा संविधान दिन,किंवा भारत देशासाठी योगदान ठरलेल्या अनेक महामानवांच्या जयंतीनिमित्त आपल्या राज कलेक्शन मार्फत सामाजिक उपक्रमात आपले योगदान देऊन आपल्या उत्पन्नातील खारीचा वाटा सामाजिक उपक्रमात खर्च करत असतात,त्यामुळे पिलीव सह परिसरातील वेगवेगळ्या राजकीय व सामाजिक संघटनेच्या व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या सय्यद बंधूंचे कौतुक व अभिनंदन होत असते,
चौकट - राज कलेक्शनचे मालक समीर सय्यद यांचे पिलीव परिसरातील सामाजिक उपक्रमात वेळोवेळी योगदान लाभत असते, त्या सामाजिक उपक्रमातील योगदानामधूनच ते सामाजिक सलोखा राखण्याचे ही काम करत असतात,
सचिन प्र.वाघमारे
नेते नाभिक समाज सेवा संघ पिलीव