मा.श्री प्रणव परिचारक(मालक)यांचे खंदे समर्थक श्री.मनोहर माने यांची उत्कृष्ट कामगिरी : पळशी गावांमध्ये हरघर भाजपा या उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त सदस्यांची नोंदणी करून केले रेकॉर्ड ब्रेक..!
पंढरपूर/प्रतिनिधी
पळशी येथे भारतीय जनता पार्टीच्या ‘संघटन पर्व’ पर्वा अंतर्गत सदस्यता नोंदणी अभियानात पांडुरंग परिवार पळशी गावचे सदस्य श्री.मनोहर प्रल्हाद माने यांनी सहभाग घेऊन पळशी येथे घर चलो अभियान अंतर्गत घरो घरी जाऊन पळशी गावातील प्रत्येक दुकानांमध्ये जात सदस्यता नोंदणी केली आहे.
भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष, महसुल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे,संघटन पर्व प्रभारी कार्यकारिणी अध्यक्ष आमदार,रविंद्र चव्हाण,आमचे मार्गदर्शक श्री.प्रशांत मालक परिचारक यांच्या आदेशानुसार आमचे नेते श्री.प्रणव मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक घरापर्यंत काम पोहोचवणे व प्रत्येक घरातील सदस्य करून घेणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी यापुढेही भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त सदस्य नोंदणी कशी करता येईल या गोष्टीकडे भर देणारा असल्याचे मनोहर माने यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले,
यावेळी पळशी गावचे विद्यमान सरपंच आकाश वाघमारे,पळशी बूथ प्रमुख मा.उपसरपंच कांतीलाल प्रल्हाद माने,श्री रघुनाथ तात्या झांबरे माजी सरपंच,युवा नेते श्री विजय राजमाने, श्री दिगंबर वाघमारे माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर, मा श्री रहीम शेख ,माजी सरपंच रामदास वाघमारे ,माजी सरपंच रामभाऊ वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे, सिताराम वाघमारे, रशीद शेख, भगवान वाघमारे ,मामा खरात, सिद्धेश्वर लोखंडे यासह आदी मान्यवर उपस्थित होते,