यंदाच्या पिलीव यात्रेला व्हाईस चेअरमन म्हणून मिळाला नवा चेहरा : नवनाथ पाटील यांची व्हाईस चेअरमन म्हणून निवड..!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव गावचे ग्रामदैवत, श्रद्धास्थान व जागृत देवस्थान म्हणून महाराष्ट्रभर ओळख असलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेस बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी 2025 पासून सुरुवात होत आहे,याच यात्रेच्या व्हाईस चेअरमनपदी यात्रा कमिटीने मा.श्री नवनाथ रामचंद्र पाटील या नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे,तर खजिनदारपदी मा.श्री नितीन हरिभाऊ कपने,मा.श्री विश्वास श्रावण जावळे व सेक्रेटरी म्हणून मा.श्री लहू दादा पाटील,मा.श्री शिवाजी महादेव पिसे तर जॉईंट सेक्रेटरी म्हणून मा.श्री सागर शंकर बगाडे व मा.श्री कबीर वैजनाथ माने यांची नियुक्ती केली असल्याचे यात्रा कमिटीचे चेअरमन मा.श्री बाबासो उर्फ संतोषकुमार गोविंदराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले,
सालाबाद प्रमाणे चालू वर्षी माघ पौर्णिमा ते माघ वद्य 8 शके 1946 दिनांक 12 /2/ 2025 ते 21/2 /2025 अखेर यात्रेस जोडून संकरित व खिलार जनावरे आणि शेतीमालांचे जंगी प्रदर्शन भरवली जाणार आहे, मल्लांच्या जंगी कुस्त्या व गजी ढोल स्पर्धा ठेवल्या आहेत,शेतकरी बंधूंनी तसेच खिलार व संकरित प्रेमी लोकांनी आपला शेतीमाल आणून प्रदर्शनात भाग घ्यावा त्याचप्रमाणे यात्रेत जनावरांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत असून या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा,श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविक-भक्तांची हेळसांड व गैरसोय होऊ नये म्हणून व्यापारी पेठेमध्ये बदल करण्यात आला आहे,तरी सर्व व्यापारी बांधवांनी जागवाटपादिवशी म्हणजेच बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता श्री महालक्ष्मी देवीच्या परिसरामध्ये उपस्थित रहावे असे नव नियुक्त व्हाईस चेअरमन मा.श्री नवनाथ पाटील यांनी माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील श्री महालक्ष्मी देवीच्या भक्तांना,व्यापाऱ्यांना व यात्रेकरूंना अहवान केले आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *